कम्युनिटी डॉक्टर कम्युनिटी कार्यकर्ता राज्यस्तरीय कार्यकारिणी जाहीर

586

अर्जुन मेदनकर,आळंदी / प्रतिनिधी : मोरया सामाजिक प्रतिष्ठाण व नेहरू युवा केंद्र यांचा संयुक्त उपक्रम

असलेल्या कम्युनिटी डॉक्टर-कम्युनिटी कार्यकर्ता या संकल्पनेतील कार्यासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. गणेश अंबिके यांच्या मार्गदर्शनात कार्याध्यक्ष विरेश छाजेड यांच्या शिष्ट मंडळाने ठरविल्या प्रमाणे पुढील ३ वर्ष कालावधीसाठी कम्युनिटी डॉक्टर कम्युनिटी कार्यकर्ता राज्यस्तरीय कार्यकारिणी निश्चित करून जाहीर करण्यात आली आहे.

मोरया सामाजिक प्रतिष्ठाण व नेहरू युवा केंद्र यांचा संयुक्त उपक्रम कम्युनिटी डॉक्टर-कम्युनिटी कार्यकर्ता राज्य कार्यकारणी अध्यक्ष डॉ. गणेश अंबिके, कार्याध्यक्ष डॉ आशिष चौहान, विरेश छाजेड, उपाध्यक्ष डॉ. विकास रत्नपारखी, संदिप भोसले, चैतन्य इंगळे, अर्जुन मेदनकर, उपकार्याध्यक्ष डॉ.सुधीर शिनगारे, डॉ.शरद जोशी, आरती विभुते, सेक्रेटरी धनवंत धिवर, उपसेक्रेटरी मेघना ठाकूर, खजिनदार राजेश डोंगरे, उपखजिनदार नितीन सोनवणे,

मुख्य संघटक सविता धुमाळ, प्रसिद्धी प्रमुख अर्जुन मेदनकर पत्रकार, हनुमान खटिंग, उपप्रसिद्धी प्रमुख गुलामअली भालदार पत्रकार, मुख्य सल्लागार नेहरू युवा केंद्र (युथ आणि स्पोर्ट्स मंत्रालय भारत सरकार) यशवंत मानखेडकर, डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्व्हिसेस रायचुरकर जुमांना, महेश डोंगरे, योगेश जाधव यांचा समावेश आहेत.

संचालक पदी डॉ. नितीन बोरा, डॉ. सरोज ग. अंबिके, अनिल झोपे, डॉ विष्णु बावणे, किसन बावकर, प्रदीप सायकर, डॉ. गीता यादव, सुरज भोईर, सुनीता सगळगिळे, डॉ. संदीप निंभोरकर, निलेश अगरवाल, ओंकार हेर्लेकर, प्रवीण जावीर, डॉ. संजय वाडकर, किरण देशमुख, उर्मिला जगताप, हेमराज थावानी, कौस्तुभ वर्तक, रतिका शर्मा, विक्रांत पवार, रवी कबाडे, महेश वंजारी, गणेश फड, रियाज सय्यद, दिपाली महाजन, निखील येवले, महेंद्र शेळके, आदित्य हरिहर, डॉ.योगेश पंडित, अध्यक्ष पुणे शहर डॉ.विनायक देंडगे, प्रसाद वाबळे यांची निवड करण्यात आली असल्याचे अध्यक्ष डॉ. गणेश अंबिके यांनी सांगितले.

युवक कार्यकारणीत युवक अध्यक्ष पदी मिहीर जाधव, उपाध्यक्ष प्रसाद पाटील, डॉ. ज्योती यादव, कार्याध्यक्ष डॉ. प्रीतम किर्वे, उपकार्याध्यक्ष माधव नरमगुडे, सचिन मेरूकर, सेक्रेटरी नितीन साळी, उपसेक्रेटरी विनोद वाघमारे, खजिनदार विशाल गुरव, उपखजिनदार वर्षा माने तसेच संचालक पदी किरण शिनगारे, ऋतुजा पवार, सुमाना चौधरी, सौरभ तापकीर, मनीष पवळे, संतोष चव्हाण, श्रद्धा खर्गे यांची निवड करण्यात आली आहे.

राज्य डॉक्टर्स सेल कार्यकारिणी अध्यक्ष पदी डॉ. चंद्रशेखर कोकाटे, उपाध्यक्ष डॉ. अंकिता भस्मे, डॉ सरोज अंबिके, सचिव डॉ. धनश्री भुजबळ यांची निवड झाली आहे. राज्य महिला कार्यकारिणी अध्यक्ष पदी तृप्ती धनवटे (रामाने) यांनी निवड झाली असून त्या लवकरच इतर कार्यकारिणी जाहीर करणार आहेत. राज्य विद्यार्थी संघटना कार्यकारिणी अध्यक्ष पदी सागर पुंडे यांची नियुक्ती जाहिर झाली असून ते इतर राज्य कार्यकारिणी जाहीर करणार असल्याचे अध्यक्ष डॉ.गणेश अंबिके, कार्याध्यक्ष आशिष चौहान, विरेश छाजेड यांनी जाहीर केले आहे.

संस्थेचे कार्यात आपत्ती व्यवस्थापन, डॉक्टर मित्र, युवकांचे हक्क, कौशल्य विकास, कम्युनिटी डॉक्टर-कम्युनिटी कार्यकर्ता, कोरोना योध्दा, संघटनेची कार्य शैली कम्युनिटी क्लीनिक ची राज्यभर स्थापना करणे, दरिद्र्य निर्मूलन, चांगले स्वास्थ्य आणि आरोग्य. दर्जेदार शिक्षण, शाश्वत शहरे आणि समाज, हवामानाचा परिणाम, शाश्वत विकासासाठी भागीदारी आदि कार्यांचा समावेश असल्याचे अध्यक्ष डॉ. गणेश अंबिके यांनी सांगितले.