“रीनैसंस द स्टेट” या पुस्तकावर बंदीची संभाजी ब्रिगेडची मागणी

463

पुणे प्रतिनिधी,

गिरिश कुबेर यांच्या “रीनैसंस द स्टेट” या पुस्तकामधील छत्रपती संभाजी महाराज आणि मातोश्री सोयराबाई राणीसाहेब यांच्याविषयीच्या आक्षेपार्ह लिखाण व पुस्तकांवर तात्काळ बंदी घालावी अशी मागणी  संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष शिवश्री उत्तमबापू कामठे यांनी  केली आहे.याबाबतचे निवेदन निवासी जिल्हाधिकारी जयश्री कटारिया यांना निवेदन देण्यात आले.
  गिरिश कुबेर नामक लेखकाने छत्रपती संभाजी महाराज आणि मातोश्री सोयराबाई राणीसाहेब यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह लिखाण Renaissance State:The Unwritten story of the Making of Maharastra या पुस्तकामध्ये केले असून यावर बंदी घातली पाहिजे.स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज साहित्यिक होते.संस्कृत भाषेवर त्यांचं प्रभुत्व होत.चारित्र्यसंपन्न व स्वराज्य निष्ठीत असणाऱ्या राजावर रयतेच सुध्दा प्रचंड प्रेम होत. अशा छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करणं हा जाणीवपूर्वक दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रकार आहे .त्यामुळे सरकारने त्वरित अशा पुस्तकांवर त्वरित बंदी घातली पाहिजे अशी मागणी केली.

याप्रसंगी उत्तम बापू कामठे, जिल्हा सचिव  तेजश्री पवार कार्याध्यक्ष धनंजय जाधव, कोषाध्यक्ष मारुती भाऊ काळे, जिल्हा संघटक तुषार भोसले, जिल्हा संघटक योगेश शिंदे आदी उपस्थित होते.