उंड्रीतील बिशेप्स शाळेच्या बंदिस्त नाल्यावर पालिकेची कारवाई

924

कोंढवा प्रतिनिधी

उंड्रीतील बिशेप्स शाळेने नैसर्गिक नाल्यावर अतिक्रमण करुन नाला बंदिस्त करून सिमा भिंत उभारली होती या बंदिस्त नाल्यामुळे येथे पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचून शेजारील ब्लिस आणि क्रोम सोसायटीच्या आवारात पाणी शिरून मोठे तळे तयार व्हायचे यामुळे पुणे मनपाच्या ड्रेनेज विभाग व बांधकाम विभाग यांच्या वतीने कारवाई करून केलेले अतिक्रमण पाडण्याचे काम चालू आहे. हि कारवाई वरिष्ठ अभियंता नामदेव गंभीरे यांच्या मार्गदर्शनाखाली कनिष्ठ अभियंता अनुप गज्जीवार व विक्रम क्षिरसागर यांनी केली .

         बिशेप्स शाळेने नाला बंदिस्त केल्यामुळे  आजुबाजूच्या सोसायटी आणि स्थानिक रहिवाशांच्या घरांमध्ये पाणी शिरुन मोठ्याप्रमाणात वित्त हानी झाली होती.मागील वर्षी देखील या परिसरातील रहिवाशांना त्रास सहन करावा लागला होता यामुळे येथील ग्रांमस्थ राजेंद्र भिंताडे अविनाश टकले, दादा कड, ओंकार होले, आकाश टकले यांनी पुणे महानगर पालिकेच्या अधिका-यांना निवेदन देऊन या परिसरातील बंदिस्त नाले ओपन करून व नैसर्गिक ओढे नाले साफसफाई करून केलेल्या अतिक्रमणांवर कारवाईची मागणी केली होती अधिका-यांनी देखिल मागील वर्षाचा अनुभव पाहता त्वरित कारवाई करून बंदिस्त नाले ओपन करण्याची व नालेसफाईची सुरुवात केली आहे. ही कारवाई सुरू झाल्याने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून त्यांनी पालिकेच्या अधिकाऱ्याचे व राजेंद्र भिंताडे यांचे आभार मानले आहे, तसेच इतर परिसरात बंदिस्त केलेले ओढे नाले त्वरित ओपन करावेत अशी मागणी देखील केली आहे.