कोंढवा प्रतिनिधी,
–पुणे शहरातील कोंढवा परिसरात पुणे शहर पोलिसांनी मध्यरात्री कारवाई करत 22 जणांना पकडले आहे. त्यांना रात्री पकडल्यानंतर समजपत्र देऊन सोडले असल्याचे सांगण्यात आले आहे. कोव्हीड नियमांचे उल्लंघन करत त्यांनी हे हॉटेल सुरू ठेवले होते व त्याठिकाणी ग्राहकांना बसून जेवण दिले असल्याचे समोर आल्यानंतर ही कारवाई पोलिसांनी केली असल्याचे कोंढवा पोलिसांनी सांगितले आहे.याप्रकरणी बाकीर रमेश बागवे व मॅनेजर प्रसाद प्रदीप शिंदे, कामगार शाहरुख फारुख शेख यांच्यासह 22 जणांवर कोंढवा पोलीसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कोंढवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एनआयबीएम रोडवर एका इमारतीत दुसऱ्या मजल्यावर ‘द व्हिलेज’ हॉटेल आहे. हे हॉटेल बाकीर रमेश बागवे यांचे आहे. दरम्यान पोलिसांना या हॉटेलमध्ये ग्राहकांना बसून जेवण दिले जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी रात्री साडे आकरा वाजण्याच्या सुमारास याठिकाणी छापा टाकला. यावेळी येथे पोलिसांना मालक बाकीरसह 22 जण मिळून आले. यात काहीजण जेवण करताना दिसून आल्याने पोलिसांनी आदेशाचा भंग करत हॉटेल सुरू ठेवून संसर्ग पसरवण्यास कारणीभूत ठरल्याबाबत गुन्हा दाखल केला. बाकीर बागवे याच्यासह मॅनेजर, कामगार व जेवण करत असलेल्या ग्राहकांवर देखील पकडले. यानंतर रात्री उशिरा या सर्वांना समजपत्र देऊन सोडण्यात आले आहे, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील यांनी सांगितले.