उंड्री पिसोळी करांची पाण्यासाठी वणवण

976

पाण्याच्या मागणी साठी जनसेवक राजेंद्र भिंताडे यांचे निवेदन

कोंढवा प्रतिनिधी,
उंड्री हे गाव पुणे महानगर पालिकेत समाविष्ट होउन गेली तीन ते चार वर्षे झाली असून उंड्री पिसोळी मधील पालिकेच्या वतीने होणारा पाणीपुरवठा अपूरा आणि अनियमित आहे,यामुळे नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागते म्हणून जनसेवक राजेंद्र भिंताडे यांनी स्वारगेट पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता राहूल सोरटे व कनिष्ठ अभियंता पुंडे यांची भेट घेऊन महंमदवाडी ते उंड्री कडनगर चौकात मुख्य पाईपलाईनला जोडण्याबाबतचे व सुरळीत करण्यासाठी निवेदन देण्यात आले, तर अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले.

उंड्री पिसोळी ही गावे महापालिकेच्या हद्दीत आहेत , येथे मोठ्या प्रामाणावर नागरीकरण झालेले असून लोकसंख्येत प्रचंड वाढ झाली आहे, गावांच्या आजू बाजूला सोसायटी, बंगले झाले असून पाण्याचा प्रश्न आ वासून उभा राहिला आहे, परिणामी नागरिकांना मोठ्या मनस्तापला सामोरे जावे लागते. परिसरातील नागरिकांची पाण्यासाठी झालेली धडपड पाहून राजेंद्र भिंताडे यांनी स्वारगेट पाणीपुरवठा व लष्कर पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता पावरा यांना देखील निवेदन दिले. तर अधिकाऱ्यांनी देखील महंमद वाडी ते उंड्री कडनगर चौकात असलेल्या मुख्य पाईप लाईनला जोडण्यात येईल असे यावेळी आश्वासन दिले. तर राजेंद्र भिंताडे यांनी ह्या लाईनचे काम त्वरित झाल्यास उंड्री पिसोळी येथील कायमचा प्रश्न सुटेल असे यावेळी म्हणाले.याप्रसंगी दादा कड, अविनाश टकले, ओंकार होले, शशिकांत पुणेकर, राजेंद्र होले, श्रीकांत भिंताडे, प्रफुल कदम आदी उपस्थित होते.