उंड्रीत पर्यावरणदिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

1043

कोंढवा प्रतिनिधी,
जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने उंड्री पिसोळी परिसरामध्ये जनसेवक राजेंद्र भिंताडे यांच्या वतीने १०० झाडे लावून जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला.
यावेळी विद्यालय, सार्वजनिक उद्याने तसेच घराच्या शेजारी वृक्षांची लागवड करण्यात आली. या उपक्रमात तरुणांनी देखील मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. तसेच बाळासाहेब पुणेकर ,वसंत कड, लालचंद भिंताडे यांच्या वाढदिवसानिमित्त ही वृक्ष लावून त्यांचे संगोपन करण्याचा निर्धार त्यांनी केला.
सिमेंटचे वाढते जंगल आणि निसर्गाची झपाटय़ाने होत असलेली हानी यामुळे तापमानात वाढ झालेली आहे. औद्योगिकीकरणामुळे रस्त्यांचे जाळे पसरलेले असले तरी रस्त्यालगत वृक्षांचा वाणवा आहे. तर दुसरीकडे उंड्री
परिसरात दररोज येणाऱ्या हजारो वाहनांमधून सोडण्यात येणारा कार्बनडॉक्साइड वायूचाही परिणाम होत आहे.
तापमान रोखण्यासाठी वृक्षलागवड करून वातावरणातील समतोल राखणे गरजेचे आहे, त्यामुळे प्रत्येक नागरिकाने एक झाड लावले पाहिजे असे मत राजेंद्र भिंताडे यांनी व्यक्त केले. त्यामुळे वृक्षांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. तरच खऱ्या अर्थाने पर्यावरण दिन साजरा केला जाईल तसेच यापुढे देखील आपण उंड्री पिसोळी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करून हा परिसर हिरवागार करणार असल्याचे मत देखील त्यांनी व्यक्त केले.
कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील, बाळासाहेब पुणेकर, वसंत कड, लालचंद भिंताडे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या वृक्षारोपण करण्यात आले .
यावेळी ब्रम्हमुहूर्त योग ज्ञानपीठ केंद्राचे योग गुरू दीपक महाराज, दादा कड, अविनाश टकले, ओंकार होले, आकाश टकले, हनुमंत घुले, श्रीकांत भिंताडे, तुषार भिंताडे, विठ्ठल भिंताडे, विजय कड, सुहास भिंताडे, राजेंद्र होले, राजेंद्र कड, सचिन भिंताडे, संतोष गोरड आदी उपस्थित होते.