संभाजी ब्रिगेड मुळशी-भोर-वेल्हा च्या विधानसभा अध्यक्षपदी राकेश सावंत यांची निवड

365

पुणे प्रतिनिधी;-

संभाजी ब्रिगडे पुणे जिल्हा कार्यकारणी अंतर्गत भोर वेल्हा मुळशी विधानसभा अध्यक्षपदी राकेश शंकर सावंत यांची निवड करण्यात आली आहे. सावंत यांचे सामाजिक क्षेत्रातील काम पाहता त्यांची ही निवड करण्यात आली. त्यांची निवड उत्तमबापू कामठे यांनी निवडीचे पत्र देऊन राकेश सावंत यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा व मार्गदर्शन केले. याप्रसंगी संभाजी ब्रिगेड भोर तालुकाध्यक्ष गणेश चह्राटे, सहकोषाध्यक्ष विवेक तुपे सरदार , योगेश शिंदे आदी उपस्थित होते.