शेतकऱ्यांसाठी योजना राबविणाऱ्या वनाधिकाऱ्यांचा संभाजी ब्रिगेड तर्फे सत्कार

1008

भोर प्रतिनिधी,

नसरापूर येथील वनविभाग महाराष्ट्र शासन यांच्या कार्यालय संभाजी ब्रिगेड पुणे जिल्हा यांच्या वतीने येथील अधिकारी कर्मचारी वर्ग यांचा जाहीर सत्कार सन्मानपत्र देऊन करण्यात आला .ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांसाठी अनेक योजना वनविभागामार्फत राबवले जातात परंतु ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना याविषयी कसल्याही प्रकारची माहिती नसल्यामुळे .आपण कोणत्या प्रकारचे वृक्ष लावल्यामुळे शेतकऱ्यांना लाभ मिळेल .याची माहिती अधिकाऱ्यांमार्फत शेतकऱ्यांना पोहोचण्याचे काम येथील अधिकारी कर्मचारी वर्ग प्रामाणिकपणे करत असल्याचे पाहायला मिळाले. भोर तालुक्यातील अनेक शेतकरी, तलाठी व  ग्रामसेवक, शिक्षक मुख्याध्यापक, तसेच या भागातील सामाजिक कार्यकर्ते युवा उद्योजक या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांना संभाजी ब्रिगेड पुणे जिल्हा यांच्या वतीने सन्मानपत्र व महापुरुषांच्या प्रतिमा देऊन सन्मानित करण्यात आले. संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष  उत्‍तम बाप्पू कामठे यांनी उपस्थित सर्वांना वनविभागाकडून कोणत्या प्रकारची कामे करून घ्यायची आहेत याबाबत शेतकरी बांधवांना स्थानिक नागरिकांना माहिती सांगितले व आपल्या डोंगर भागातील व कोरडवाहू शेतामध्ये बांबूचे पीक घेऊन सुजलाम सुफलाम होऊ शकतं. आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळपास 180 प्रकारचे बांबू ची शेती करता येते असे अनेक प्रकारचे बांबू किंवा वृक्ष आपण आपल्या शेतात बांधावर लावून आपण वृक्ष संवर्धन करून निसर्गाची काळजी घेऊया असे आव्हान या ठिकाणी करण्यात आला या या कार्यक्रमाचे आयोजन संभाजी ब्रिगेड पुणे जिल्हा व नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष संभाजी ब्रिगेड मारुतीराव खुटवड तसेच या भागातील सर्व शासकीय अधिकारी अनेक शेतकरी बांधव यांच्यावतीने करण्यात आलं होतं या कार्यक्रमाप्रसंगी नरसापुर वनविभागाचे वनपाल  एस यु जाधवर सर, तसेच वनपाल लांडगे  ,वनरक्षक  नवनाथ पगडे सर तलाठी अन्वर शेख ,ग्रामसेवक शहाजी कोकाटे,,मुख्याध्यापक एकनाथ अवसरे  ,उद्योजक राहुल खुटवड, सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रेय खुटवड, विकास खुटवड, दत्ता सुदाम खुटवड तसेच करुणा काळात उल्लेखनीय काम काम करणारे अजित भिलारे व या भागातील शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री नवनाथ पगडे वनरक्षक यांनी केलं व उपस्थितांचे आभार नवी मुंबई जिल्हाध्यक्ष मारुती खुटवड साहेब यांनी केले.