कष्टकरी शांताबाई पवार यांना जनसेवक राजेंद्र भिंताडे यांची मदत

511

कोंढवा प्रतिनिधी

शांताबाई पवार यांना आख्खा महाराष्ट्र नव्हे तर देश ओळखतो, गेल्या वर्षीच्या लॉक डाऊन मध्ये या आजींचे नाव आख्या देशात प्रसिद्ध झाले होते, त्यांना मोठ्या प्रमाणात मदत देखील मिळाली होती, पण या वर्षी पुन्हा लॉक डाऊन आणि मिळालेली तुटपुंजी यामुळे घर चालविणे मुश्किल झाले होते, यामुळे त्यांनी पुन्हा रस्त्यावर उतरून आपली कला सादर करायला सुरुवात केली. कोंढवा रस्त्यावरील एन आय बी एम रस्त्यावर आपली कला सादर करत असताना सामाजिक कार्यकर्ते , जनसेवक राजेंद्र भिंताडे यांनी पाहिले आणि त्वरित पवार यांना एक महिना पुरेल असे राशन आणि आर्थिक मदत केली.
शांताबाई पवार या आपल्या कुटुंबातील 12 लोकांचा सांभाळ करत असून आपली कला रस्त्यावर सादर करून कुटूंबाचा प्रपंच चालवीत आहेत. त्यांचे वय 85 असून या वयात देखील त्या त्याच जोमाने आपली कला सादर करून लोकांचे मनोरंजन करून आपला कुटूंबाचा गाडा हाकत आहे. लॉक डाऊन मुळे प्रचंड हाल झाले असून आता गेल्या वर्षी मिळालेली आर्थिक मदत तर लगेच संपली होती त्यामुळे आता लॉक डाऊन उठताच कुटुंबाचा गाडा हाकण्यासाठी रस्त्यावर उतरून आपली काठीची कला दाखवून लोक देतील ती मदत घेत आहेत अशा त्या यावेळी म्हणाल्या. राजेंद्र भिंताडे नेहमी आपल्याला मदत करत असतात , त्यांनी मला पाहताच आस्थेने विचारपूस करून एक महिना पुरेल एवढे राशन आणि आर्थिक मदत केली आहे. भिंताडे बंधूनी केलेली मदत आपण कधीही विसरू शकणार नाही , ते नेहमीच आपल्या पाठीशी आहेत असे नेहमी जाणवत असते, आपण कोंढवा-उंड्री परिसरात आपली कला सादर करण्यास आलो असता ते भेटले नाहीतर काही चुकल्यासारखे वाटत असते , असेही त्या यावेळी म्हणाल्या.
याप्रसंगी भानूदासस भिंताडे, दादा कड, अविनाश टकले,ओंकार होले,सुभाष घुले, शशिकांत पुणेकर, अक्षय टकले, अक्षय फुलावरे, श्रीकांत भिंताडे, तुषार भिंताडे, विठ्ठल भिंताडे, विशाल कामठे, संतोष गोरड, कपिल आबनावे आदी उपस्थित होते.