लाचखोर तलाठी लाचलुचपतच्या जाळ्यात; योगगुरूंनी शिकवली चांगलीच अद्दल

787

अनिल चौधरी, पुणे

ब्रम्हमुहूर्त योग ज्ञानपीठ केंद्राचे प्रसिद्ध योगगुरू श्री.दीपक महाराज हे पुणे तसेच महाराष्ट्रात योगाचे मोफत प्रशिक्षण देत आहेत. त्यांचे रोज पहाटे योग प्रशिक्षण पुण्यातील अनेक भागांमध्ये पुणेकर नगारिकांना मोफत दिले जाते. त्यांच्यावतीने योग शिबिरांचे आयोजन देखील केले जाते. त्यामुळे गुरुदेवांना शांत , नैर्सगिक परिसर असलेली जागा मेडिटेशन आणि योगासाठी हवी होती आणि ते शोधत असताना त्यांना वेल्हे तालुक्यातील दामगुड आसनी येथील जागा पसंत पडली आणि त्यांनी त्वरित ती खरेदी देखील केली. जागा खरेदी केल्यानंतर तिचे नोंद करणे कायदेशीर असते. त्यामुळे गुरुदेव श्री. दीपक महाराज व त्यांच्या सहकाऱ्यानी जागेची नोंद सातबाऱ्यावर करण्यासाठी वेल्हे तालुक्यातील तलाठी मुकुंद त्रिंबकराव चिरके (वय ३४) यांच्याशी संपर्क करून सातबाऱ्यावर नोंद करण्यासाठी विनंती केली . सादर नोंद कण्र्यासाठी तलाठी चिरके याने गुरुदेव श्री.दीपक महाराज यांच्या कडे दहा हजार रुपयांची लाच मागितली.
   वास्तविक तलाठ्याला पूर्व कल्पना दिली कि सदर जागा आपण योग प्रक्षिक्षण आणि मेडिटेशन साठी घेत असून आपण त्वरित यावर नोंद करून द्यावी, पण लाचखोर तलाठी असल्याने त्याने दहा हजार रुपयांची लाच त्याने गुरुदेवांकडे मागितली . लाच दिल्याशिवाय आपले काम होणार नसल्याचे गुरुदेवांच्या लक्षात आल्याने त्यांनी पुणे येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करून, तक्रार दाखल करून कारवाईची मागणी केली. दिलेल्या तक्रारीची सत्यता पडताळून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यानी सापळा रचण्याची तयारी केली . इकडे ब्रम्हमुहूर्त केंद्राचे साधकानी तलाठ्यास पुन्हा विनंती केली असता त्याने तडजोडी अंती आठ हजार रुपये लाच देण्याची मागणी केली. तर चिरके याने लाचेचे आठ हजार रुपये घेऊन पुणे-बेंगलोर हायवे वरील नसरापूर उड्डाणपुलाखाली बोलाविले, गुरुदेवांनी त्वरित लाच लुचपत विभागाचे पोलीस निरीक्षक सुनील बिले यांच्याशी संपर्क करून त्यांना माहिती दिली त्याप्रमाणे एसीबीच्या अधिकाऱ्यानी पुलाखाली सापळा रचला. थोड्याच वेळात लाचखोर तलाठी तिथे आला व त्याने लाचेची मागणी करून आठ हजार रुपयांची लाच स्वीकारत असताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील बिले, कर्मचारी वैभव गोसावी, रितेश थरकार, भूषण ठाकूर, चालक जाधव यांनी तलाठी चिरके यांस रंगेहात पकडले.
दरम्यान लाचखोर चिरके यास पकडल्याचे समजताच, वेल्हे तालुक्यातील अनेक शेतकरी, नागरिकांनी आनंद व्यक्त केला असून गुरुदेवांचे आभारासाठी अनेक फोन खणखणत होते.
आपणासही कोणी खाजगी, सरकारी व्यक्ती लाच मागत असल्यास आपण लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन एसीबीने केले आहे.