मुंबई, 25 जून 2021: जागतिक डेअरी क्षेत्रातील नामवंत मानण्यात येणाऱ्या लॅक्टलीस महाराष्ट्रात सनफ्रेश अॅग्रो इंडस्ट्रीज (स्व-मालकीचा ब्रँड प्रभात) नावाने कार्यरत आहे. या ब्रँडच्या वतीने कोविडशी सामना करण्यासाठी आपल्या कर्मचारी वर्गाकरिता लसीकरण अभियान आयोजित केले. कंपनीकडून आपल्या कर्मचारी वर्गाला अपेक्षित तिसऱ्या लाटेच्या प्रभावापासून सुरक्षित ठेवण्याकरिता व संसर्गाचे उच्चाटन करण्याच्या हेतूने सर्व त्या महत्त्वाच्या उपाययोजना राबविण्यात येत आहेत.
सर्व कर्मचारी वर्गाचे लसीकरण अल्पावधीत करणे हे अतिशय आव्हानात्मक काम आहे. लॅक्टलीस’च्या वतीने नवी मुंबई आणि श्रीरामपूर निर्मिती प्रकल्पासाठी मेडीकव्हर हॉस्पिटल तर पुण्याकरिता जहांगीर हॉस्पिटलसमवेत भागीदारी केली आहे. या लसीकरण मोहिमेचा लाभ 2,000 हून अधिक कर्मचारी वर्गाला होणार असून त्यात कारखान्याचे कर्मचारी, अग्रभागी असलेले विक्रेते, दूग्धसंग्रह करणारे कर्मचारी तसेच कर्मचारी वर्गाचा समावेश करण्यात आला आहे. या उपक्रमातून नियमित 300-400 व्यक्तिंचे लसीकरण शक्य होईल. दूग्ध प्रक्रिया युनिटमध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना ऑन-प्रिमाईस लसीकरण उपलब्ध करून देण्यात येईल.
लशींची कमतरता निर्माण झाल्याने प्रामुख्याने ग्रामीण भागात मोठे आव्हान निर्माण झाले. त्याचप्रमाणे लसीविषयी असणाऱ्या गैरसमजुतींचा मोठा अडथळा होता. लॅक्टलीसच्या वतीने कर्मचारी वर्गाला शिक्षित करण्यासोबत ग्रामस्थांच्या कुटुंबियांचे शिबिरांत लसीकरण करून घेण्यासाठी बरेच प्रयत्न करण्यात येत आहेत.
या लसीकरणाविषयी बोलताना सनफ्रेश अॅग्रो – लॅक्टलीस ग्रुपचे सीईओ राजीव मित्रा म्हणाले की, “कोविड 19 लसीकरणाच्या आव्हानात्मक टप्प्यासाठी लॅक्टलीस आपल्या कर्मचारी वर्गाच्या सुरक्षेबद्दल पाय रोवून सज्ज आहे. लॅक्टलीसमध्ये आमच्यावर सर्व कर्मचाऱ्यांची जबाबदारी आहे, असे आम्ही मानतो. त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही उपाययोजना राबविण्याकरिता सर्व ते प्रयत्न करत आहोत. आमच्या प्रकल्पांना संसर्गाचा स्पर्श होऊन नये यासाठी आम्ही लसीकरण मोहिमेचे आयोजन केले आहे. त्याचवेळी महासाथ जोमाने पसरत असताना आमचा व्यवसाय नफ्याचे गणित राखेल यादृष्टीने पावले उचलत आहोत.”
दुसऱ्या लाटेनंतर टाळेबंदीचे निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्यात आल्याने रेस्टॉरंट, हवाई सेवा आणि संस्थात्मक खरेदीदार यांसारख्या विविध व्यवसाय प्रकारातील घटकांनी कामकाजाला सुरुवात केली आहे. त्यामुळे देशातील दूग्धजन्य साहित्य आणि पदार्थांच्या मागणीत वाढ झाली. देशात दूग्धजन्य साहित्य आणि पदार्थांच्या मागणीत महाराष्ट्र प्रमुख पुरवठादार मानला जातो. बाजारामधील गरजा भरमसाठ असल्याने अग्रभागी राहून मागणी पूर्ण करणे ही कंपनीची जबाबदारी असल्याचे कंपनीला वाटते.