उंड्रीसह बारा वाड्यांमधील दुकानदारांना कोरोना प्रतिबंधक लस प्राधान्याने द्या: राजेंद्र भिंताडे

318

कोंढवा प्रतिनिधी

कोरोनाची लाट ओसरत असताना आता डेल्टा व्हायरस चा शिरकाव हळूहळू पुण्यासह जवळील गावांमध्ये होऊ लागला आहे. लसीकरणाने देखील आता वेग घेतला आहे. परंतु पुण्याजवळील नव्याने समाविष्ट झालेली गावांमध्ये लसीकरणाचा वेग मंदावला असून येथे लसीकरणाची सोय नसून जवळच्या गावांमध्ये जावे लागते. उंड्री-पिसोळी परिसरात लसीकरणाची सोय असून बारा वाड्यांमधील नागरिकांना येथील लसीकरण केंद्रावर अवलंबून राहावे लागते. येथील परिसरात मोठ्या प्रमाणात दुकानदार असून त्यांचा थेट नागरिकांशी संबंध येत असल्याने नागिरकांना कोरोनाचा संसर्ग होण्याची कायम भीती असते म्हणून सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र भिंताडे यांनी महापालिकेचे आरोग्य अधिकारी आशिष भारती यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे उंड्री – पिसोळी सह बारा वाड्यांमधील दुकानदारांना कोरोना प्रतिबंधक लस प्राधान्याने देण्याची मागणी केली आहे.
उंड्री परीसराच्या आस पासच्या गावांचा नुकताच पालिकेत समावेश झालेला असून येथील १८ वर्षे आणि पुढील नागरिकांचे त्वरित लसीकरण सुरु करून त्याची ताबड्तोक अंलबजावण्याची करण्याची मागणीही राजेंद्र भिंताडे यांनी पालिकेच्या आरोग्य विभागाचे अधिकारी भारती यांच्याकडे केली आहे. जर आठ दिवसात लसीकरण सुरु केले नाही तर मोठे जनआंदोलन करण्याचा इशारा देखील भिंताडे यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे. याप्रसंगी भाजपा वैद्यकीय आघाडीच्या उपाध्यक्षा तेजस्विनी अरविंद, दादा कड, अविनाश टकले, ओंकार होले, हनुमंत घुले, तुषार भिंताडे, विठ्ठल भिंताडे, श्रीकांत भिंताडे आदी उपस्थित होते.