फरहान अख्‍तर, मृणाल ठाकूर आणि राकेश ओमप्रकाश मेहराने पुण्‍यामध्‍ये आणला ‘तूफान’

482

पुणे प्रतिनिधी

अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर चित्रपट ‘तूफान’ सुरू होण्‍यापूर्वी तूफानी टीम – फरहान अख्‍तर, मृणाल ठाकूर व राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी आज अद्वितीय व्‍हर्च्‍युअल शहरी दौ-याच्‍या माध्‍यमातून पुण्‍याला भेट दिली. भारतभरातील विविध शहरांना व्‍यापून घेणा-या या अद्वितीय व्‍हर्च्‍युअल दौ-यामध्‍ये टीम विविध राज्‍यांमधील मीडिया, चाहते व स्‍थानिक हिरोजसोबत गप्‍पागोष्‍टी करताना पाहायला मिळेल. मीडियाला चित्रपट निर्मितीची विशेष झलक दाखवण्‍यात आली, ज्‍यामुळे चित्रपटाप्रती त्‍यांची उत्‍सुकता व उत्‍साह वाढला आहे.

प्रमुख अभिनेता व सह-निर्माता फरहान अख्‍तर ‘तूफान’साठी व्‍हर्च्‍युअल शहर भेटीसाठी उत्‍सुक होते, ते म्‍हणाले, ”पुणे हे इतर प्रत्‍येक शहराप्रमाणे उत्तम संस्‍कृती व प्रेरणादायी कथांचे स्‍थान आहे. हे देशातील काही प्रख्‍यात क्रीडा व्‍यक्तिमत्त्वांचे घर आहे आणि आपल्‍याला त्‍यांच्‍या योगदानाचा अभिमान वाटतो. निर्माता व अभिनेता म्‍हणून मला पुण्‍यामधील स्‍थानिक मीडियासोबत गप्‍पागोष्‍टी करण्‍याची आणि ‘तूफान’च्‍या प्रबळ व प्रेरणादायी कथेबाबत सांगण्‍याची संधी मिळाल्‍याने खूप आनंद होत आहे. अनेक वर्षांपासून या शहराने मला दिलेले प्रेम व पाठिंबा पाहून मी खूप भारावून गेलो आहे.” चित्रपटामधील भूमिकेबाबत सांगताना ते म्‍हणाले, ”चित्रपट ‘तूफान’सह मला समजले आहे की, शारीरिकदृष्‍ट्या कितीही प्रबळ असले तरी बॉक्‍सरच्‍या जीवनात सामावून जाणे पूर्णत: नवीन अनुभव आहे. मी भूमिकेसाठी शारीरिकदृष्‍ट्या व मानसिकदृष्‍ट्या तयार असण्‍यासाठी दररोज ८ ते ९ तास प्रखर प्रशिक्षण घेतले. ही भूमिका व कथा माझ्या मनाच्‍या खूप जवळ आहे आणि आशा करतो की, प्रेक्षकांना ही भूमिका आवडेल.”

व्‍हर्च्‍युअल शहर भेटींबाबत आपला उत्‍साह व्‍यक्‍त करत प्रमुख अभिनेत्री मृणाल ठाकूर म्‍हणाली, ”मी फरहान यांच्‍या मताला दुजोरा देते की, क्रीडाक्षेत्रामध्‍ये पुण्‍याचे मोठे योगदान राहिले आहे. मला येथील लोकांसोबत गप्‍पागोष्‍टी करण्‍याचा खूप आनंद होत आहे. मला या शहराबाबत आवडलेली बाब म्‍हणजे येथील विविधता. शहरातील लोकांपासून पाककलेपर्यंत येथे भारतभरातील अनेक भारतीय पाककला पाहायला मिळू शकतात. या शहराबाबत माझ्या काही सर्वोत्तम आठवणी म्‍हणजे तरी मिसळ पाव व भाकरवडी सारख्‍या स्‍वादिष्‍ट पदार्थांवर ताव मारणे. मी प्रत्‍येकवेळी या शहराला भेट देते तेव्‍हा वेळात वेळ काढून गोड व स्‍वादिष्‍ट स्‍थानिक पाककलांचा आस्‍वाद घेते. पाककलेव्‍यतिरिक्‍त पुणे शहर पर्यटन स्‍थळांसाठी देखील प्रसिद्ध आहे, माझी काही आवडीची पर्यटन स्‍थळे या शहरांमध्‍ये आहेत.” आपल्‍या भूमिकेबाबत सांगताना ती म्‍हणाली, ”रिंगणामध्‍ये असलेल्‍या प्रत्‍येक पुरूषाला महिलेचा पाठिंबा असतो. माझी भूमिका अनन्‍या अज्‍जू भाईला अझिझमध्‍ये रूपांतरित करण्‍याच्‍या संपूर्ण प्रवासामध्‍ये उत्‍प्रेरकाची भूमिका बजावते. या भूमिकेला इतरांपेक्षा वरचढ ठरवणारी बाब म्‍हणजे ती आत्‍मविश्‍वासू, दयाळू व उदारमतवादी मुलगी आहे. अनन्‍याची भूमिका साकारल्‍यानंतर मला वाटते की, एक अभिनेत्री म्‍हणून मी अधिक निर्णायक व आत्‍मविश्‍वासू बनली आहे. मला खात्री आहे की बॉलिवूडमधील प्रत्‍येक अभिनेत्रीला अशा प्रकारची भूमिका साकारायला आवडेल. मला आनंद होत आहे की, मला प्रबळ व नीडर अनन्‍याची भूमिका साकारण्‍याची ही संधी मिळाली आहे.”

दिग्‍दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा म्‍हणाले, ”पुणेकर खूपच स्‍वागतार्ह आहेत. मी येथील लोकांच्‍या विनम्र व शांतचित्त स्‍वभावाचे मनापासून कौतुक करतो. स्‍थानिक मीडियासोबत गप्‍पागोष्‍टी करताना खूपच चांगले वाटले आणि त्‍यांनी या वर्षांमध्‍ये दिलेले प्रेम व पाठिंब्‍यासाठी त्‍यांचे मनापासून आभार मानतो. मी आशा करतो ते चित्रपट ‘तूफान’साठी देखील त्‍यांचे प्रेम व आशीर्वादांचा वर्षाव करतील.” ते पुढे म्‍हणाले, ”चित्रपट ‘तूफान’ची कथा एका व्‍यक्‍तीला सामना कराव्‍या लागणा-या आव्‍हानांबाबत आणि असे असताना देखील कधीच हार न मानण्‍याच्‍या वृत्तीबाबत आहे. हा मनोरंजनपूर्ण, तसेच रोमांचक, विचारशील व प्रेरणादायी चित्रपट आहे. तर मग कॅलेंडरवरील तारखेवर खूण करून ठेवा आणि पॉपकॉर्न तयार ठेवत हा मनोरंजनपूर्ण चित्रपट पाहण्‍याचा आनंद घेण्‍यासाठी सज्‍ज राहा.”

एक्‍सेल एंटरटेन्‍मेंट व आरओएमपी पिक्‍चर्ससोबत सहयोगाने अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ प्रस्‍तुत चित्रपट ‘तूफान’ हा रितेश सिधवानी, राकेश ओमप्रकाश मेहरा व फरहान अख्‍तर यांची निर्मिती असलेला प्रेरणादायी स्‍पोर्टस् ड्रामा आहे. या चित्रपटामध्‍ये प्रतिभावान कलाकार आहेत, जसे प्रमुख भूमिकेत फरहान अख्‍तरसह मृणाल ठाकूर, परेश रावल, सुप्रि‍या पाठक कपूर, हुसैन दलाल, डॉ. मोहन आगाशे, दर्शन कुमार आणि विजय राज. राकेश ओमप्रकाश मेहरा यांचे दिग्दर्शन असलेल्‍या चित्रपटाचा उत्कंठावर्धक ट्रेलर आपल्‍याला स्‍थानिक गुंड अज्‍जू भाईचा व्‍यावसायिक बॉक्‍सर अझिझ अली बनवण्‍यापर्यंतच्‍या प्रवासाची झलक दाखवतो. ‘तूफान’ ही आवड व चिकाटीने भरलेली आशा, निष्‍ठा व अंतरिक शक्‍तीची कथा आहे.

‘तूफान’ हा एकाच वेळी हिंदी व इंग्रजीमध्‍ये २४० देश व प्रदेशांमध्‍ये १६ जुलै २०२१ पासून अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रिमिअर होणारा पहिला चित्रपट असेल.

चित्रपटाचा सारांश:

अपरिहार्य वातावरणामध्‍ये डोंगरीच्‍या रस्‍त्‍यावर जन्‍मलेला एक अनाथ मुलगा मोठा होऊन स्‍थानिक गुंड बनतो. तो मोहक व दयाळू तरूणी अनन्‍याला भेटल्‍यानंतर त्‍याच्‍या जीवनाला कलाटणी मिळते. ती त्‍याला योग्‍य दिशेने जाण्‍यास मार्गदर्शन करते. प्रेम व मार्गदर्शनासह त्‍याला खेळाप्रती आवड निर्माण होते आणि तो जागतिक दर्जाचा बॉक्‍सर बनण्‍याच्‍या दिशेने वाटचाल सुरू करतो. ही प्रेरणादायी कथा आहे. जीवनातील प्रतिकूल परिस्थितींचा सामना करणारे गरीब व वंचित व्‍यक्‍ती जीवनाच्‍या उत्तरार्धात मेहनत घेत आणि योग्‍य मार्गाचा अवलंब करत देशाचे हिरोज बनू शकतात. ‘तूफान’ चित्रपट मुंबईशी निगडित आहे. मुंबई शहर चित्रपटाच्‍या तिस-या पात्रासारखे आहे. मुंबई हे भारतातील महानगर व उत्तम शहरांपैकी एक आहे. हे कॉस्‍मोपोलिटन शहर असून येथे विविध संस्‍कृती व धर्म आहेत. मुंबईकरांच्‍या स्पिरीटसह मुंबई धावते. हा ‘स्पिरीट’ मुंबईचा अभिमानी अधिकार आहे, जो पात्रांच्‍या माध्‍यमातून चित्रपटामध्‍ये पाहायला मिळतो.

ट्रेलर येथे पाहा: https://youtu.be/4qalsBNwZds