राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुण्यात मनसेचे राज्यातील पहिले आपत्ती व्यवस्थापन पथक स्थापन

595

गणेश जाधव, कोंढवा 
आगामी पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे पुन्हा एकदा पदाधिकाऱ्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या संपर्कात “राजसंवाद “या माध्यमातून येत आहेत. नाशिक दौऱ्यानंतर पुण्यात आलेल्या राज ठाकरे यांचा ‘राजसंवाद’ हा दौरा सुरु झाला आहे. या दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस असून राज ठाकरे पदाधिकाऱ्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या मॅरेथॉन बैठका घेत आहेत. मोठ्या उत्साहात राज ठाकरे यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून स्वागत केलं जात आहे. ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी आणि घोषणाबाजी केली जात आहे.

कोंढव्यातील ,लोणकर लॉन्स याठिकाणी राज ठाकरे यांनी आज पांडुरंगाच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करत दर्शन घेत बैठकीला सुरुवात केली होती. उपस्थित वारकऱ्यांनी राज ठाकरे यांना शाल आणि पांडुरंगाची प्रतिमा भेट देऊन स्वागत केले. आज हडपसर आणि कॅन्टोनमेंट विधानसभा मतदार संघाचा आढावा घेतला जात आहे.

या दौऱ्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज्यातील पहिल्या आपत्ती व्यवस्थापन पथकाची (Disaster Management Squad) घोषणा केली आहे. पूर, इमारत दुर्घटना यासारख्या संकटकाळात हे आपत्ती व्यवस्थापन पथक प्रशासनाच्या मदतीला येईल.हे मनसेचे राज्यातील पहिले आपत्ती व्यवस्थापन पथक स्थापन केले आहे.

आपत्ती व्यवस्थापन पथकात काय असेल:-
मनसेने पुण्यात राज्यातील पहिले आपत्ती व्यवस्थापन पथक स्थापन केले.
– आपत्ती व्यवस्थापन पथकात 50 मुला-मुलींचा समावेश असेल.
– शहरातील पूरस्थिती, इमारत दुर्घटना यासारख्या संकटांच्या वेळी मनसेचे आपत्ती व्यवस्थापन पथक प्रशासनाची मदत करणार.
– आपत्ती व्यवस्थापन पथकातील मुला-मुलींना मनसे प्रशिक्षण देणार..

पुणे शहरातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांपैकी प्रशिक्षित पुरुष आणि महिला यांचा पथकात समावेश असेल. पुणे शहरात सतत नैसर्गिक आपत्ती कोसळत असते. त्यासाठी 50 जणांचे प्रशिक्षित मनसे रेस्क्यू पथक कार्यरत असेल. पुणे शहरात वारंवार आपत्ती ओढवत असते.

दरम्यान, पुणे महापालिकेत मनसेची चांगली कामगिरी व्हावी म्हणून राज ठाकरे यांनी पक्षाच्या शाखाध्यक्षांसाठी भन्नाट ऑफरही दिली. “चांगलं काम करणाऱ्या शाखाध्यक्षांच्या घरी मी जेवायला येईल,” असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. कार्यकर्त्यांमध्ये उभारी भरण्यासाठी राज यांनी ही ऑफर दिली आहे. सध्या पुण्यता मनसे कार्यकर्त्यांमध्ये या ऑफरची जोरदार चर्चा सुरू आहे..

याप्रसंगी मनसेचे शहराध्यक्ष वसंत मोरे ,गटनेते साईनाथ बाबर , मनसे महिला शहराध्यक्ष रूपालीताई ठोंबरेपाटील आदी मान्यवर तसेच हडपसर विधानसभेचे पदाधिकारी, कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.