राज्यातील पहिल्या शेकरू प्रजनन केंद्र आणि रानमांजर केंद्राचे कात्रजमध्ये राज ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन !

457

गणेश जाधव,पुणे

पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौऱ्यावर असलेले मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा “राज संवाद” हा दौरा मोठ्या उत्साहात सुरू आहे. राजसंवाद या दौऱ्याच्या माध्यमातून पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे पदाधिकाऱ्यांच्या तसेच कार्यकर्त्यांच्या भेटीला महत्त्व देत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.याच राज संवाद दौऱ्यादरम्यानपुणे महापालिकेच्या माध्यमातून कात्रज येथील राजीव गांधी प्राणीसंग्रहालयात उभारण्यात आलेल्या राज्यातील पहिल्या शेकरू प्रजनन केंद्र आणि रानमांजर केंद्राचे उद्घाटन मनसे अध्यक्ष मा.श्री. राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते आज करण्यात आलं.नगरसेवक वसंत मोरे यांनी या प्रकल्पासाठी विशेष प्रयत्न केले.

राजीव गांधी प्राणी संग्रहालयात आता शेकरू व रानमांजर पाहता येणार आहे. उद्यानात शेकरुंचे एक जोडपे प्रजननासाठी आणण्यात आलेले आहे. त्याचबरोबर रानमांजरांची तीन जोडपीही येथे आणण्यात आलेली आहेत.

यावेळी स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार, मनसे नेते अनिल शिदोरे, नगरसेवक साईनाथ बाबर, ऍड गणेश सातपुते, योगेश खैरे, रुपाली ठोंबरे पाटील, राजीव गांधी संग्रहालयाचे संचालक डॉ.राजकुमार जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.