उंड्रीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

388

संतोष गोरड, कोंढवा प्रतिनिधी

उंड्रीत माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त कात्रज येथील ममता फौंडेशनमध्ये अनाथ मुलांना फळे व वाफेचे मशीन वाटप करण्यात आले . तसेच उंड्रीत विविध ठिकाणी वृक्ष रोपण व सफाई कामगारान मास्कचे वाटप भारतीय जनता पार्टी , उंड्री पिसोळी च्या वतीने करण्यात आले. यावेळी ममता फौंडेशनच्या अध्यक्षा डॉ.शिल्पाताई बुडूख यांनी अनाथ आश्रमाला मदत केल्याबद्दल जनसेवक राजेंद्र भिंताडे व अविनाश टकले यांचे आभार मानले.         याप्रसंगी भा ज पा चे जनसेवक राजेंद्र भिंताडे युवा मोर्चा अध्यक्ष अविनाश टकले अध्यक्ष दादासो कड ओ बी सेल चे अध्यक्ष ओंकार होले अध्यक्ष हनुमंत घुले सचिन भिंताडे राजेंद्र होले विठ्ठल भिंताडे तुषार भिंताडे श्रीकांत भिंताडे व ग्रामस्थ उपस्थित होते