कार्तिकी घुले “नवराष्ट्र महिला पुरस्काराने” सन्मानित

60

कोंढवा प्रतिनिधी,
महंमदवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते हनुमंत घुले यांच्या पत्नी कार्तिकी घुले यांना सामाजिक क्षेत्रातील विशेष कार्याबद्दल “माता जिजाऊ सामाजिक पुरस्कार” भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील व विधानपरिषदेच्या उपसभापती निलमताई गोऱ्हे यांच्या हस्ते तसेच महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, उद्योगपती कृष्णकुमार गोयल यांच्या उपस्थित पुरस्कार देण्यात आला. दैनिक नवराष्ट्र व नवभारतच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शोभा लगड, राणीताई फरांदे, सविता सातव आणि नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.