कोंढवा खुर्द मधील एन आय बी एम रोड ते साळुंखे विहार रोड यांना जोडणा-या अंबावाटीका रोडवर दोन्ही बाजूस नो-पार्कींग झोन

563

पुणे, दि. 28 :- कोढंवा वाहतूक विभागांतर्गत प्रभाग क्र २६ कोंढवा खुर्द मधील एन आय बी एम रोड ते साळुंखे विहार रोड यांना जोडणा-या अंबावाटीका रोडवर दोन्ही बाजूस अत्यावश्यक सेवेतील वाहने उदा. फायरब्रिगेड, पोलीस वाहने, रुग्णवाहिका इत्यादी खेरीज अन्य वाहनांसाठी नो-पार्कींग करण्यात आले असल्याचे आदेश वाहतूक शाखेचे पोलीस उपआयुक्त राहुल श्रीरामे यांनी निर्गमित केले आहेत.

मेडीको पॉईट ते साईराम जनरल स्टोअर्स, दोराबजी इन्क्लेव्ह सोसायटी पर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना तसेच सुप्रिम क्लासीक बिल्डींग ते राज होम्स सोसायटी, एन आय बी एम चौकापर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना नो- पार्किंग करण्यात येत आहे.
याबाबत नागरिकांच्या काही सूचना व हरकती असल्यास पोलीस उप-आयुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, बंगला नं. 6, येरवडा पोस्ट ऑफीसजवळ, पुणे- 6 यांच्या कार्यालयात दिनांक 5 ऑगस्ट 2021 पर्यंत लेखी स्वरुपात कळवाव्यात, असेही वाहतूक शाखेचे पोलीस उपआयुक्त राहुल श्रीरामे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
****