“मराठवाडा इंटरनेशनल फिल्म फेस्टिवल का आयोजन”

423

सहभागी होण्याचे अनिल कुमार शिंपी फेस्टिवल डायरेक्टर याचे आव्हान
औरंगाबाद (शेख इम्रान):-
भारतीय सिनेयुग प्रोडक्शन आणि अकेडमी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 10 ऑगेस्ट 2021 ते 12 ऑगेस्ट 2021पर्यंत मराठवाडा इंटरनेशनल फिल्म फेस्टिवल चे आयोजन करण्यात आले आहे.
मराठवाड्यात प्रथमच येवढ्या भव्य आणि दिव्य प्रकारे फिल्म फेस्टिवल चे आयोजन करण्यात येत आहे.
ह्या फेस्टिवल मध्ये नेशनल आणि इंटरनेशनल ह्या दोन्ही प्रकारच्या असंख्य अश्या कलात्मक व दर्जेदार अश्या फिल्म पाहावयास मिळणार आहेत.
कलावीश्वातील नामवंत ह्या स्पर्धेत सहभागी होत आहेत याच बरोबर राजकीय, सामाजिक क्षेत्रातील दिग्गज अश्या लोकांचा आशीर्वाद व सहभाग असणार आहे .
नामवंत कलावंत ह्या फेस्टिवल मध्ये आपल्या कला सादर करून एक भरगच्च मनोरंजन आपल्या रसिक मायबाप ह्यांच्या करिता सादर करणार आहेत…
अश्या ह्या नेत्रदीपक फिल्म फेस्टिवल ला आपल्या सूज्ञ रसिक कांचे आशीर्वाद असावेत ही विनंती . सदर चित्रपट महोत्सव हा khinvasara cinplex Cinema (AmbaApsra) Aurangabad इथे संपन्न होणार आहे .
रसिक प्रेक्षक व कलाक्षेत्रातील सर्वांनाच आमच्या संस्थे मार्फत विनंती आहे की ह्या होणाऱ्या महोत्सवात मोठ्या प्रमाणत सहभागी होऊन हा सोहळा यशस्वी करावा ..तसेच ज्या चित्रपट संस्थेला ह्या महोत्सवात सहभागी व्हायचं आहे व ज्या प्रायोजक कंपनी ला आपल्या प्रॉडक्ट चे प्रमोशन करायचे असेल किंवा सदर महोत्सवात सम्पूर्ण फेस्टिवल चे प्रायोजकत्व स्वीकारायचे असेल त्यांनी देखिल अनिल कुमार शिंपी
फेस्टिवल डायरेक्टर यांना संपर्क करून सदर महोत्सव यशस्वी करण्यास आम्हांस उपकृत करावे.