द हाऊस ऑफ सलॉन अ‍ॅप्पलची नवी श्रृंखला- १९९३ ए सलॉन कंपनी महाराष्ट्रात लॉन्च 

407

उत्साही ब्रँड, उत्तम दर्जाची ब्युटी, ग्रुमिंग सेवा देणाऱ्या १९९३ ए सलॅान कंपनीद्वारे सलॉन अ‍ॅप्पलच्या सर्व ब्युटी सर्व्हिसेस.

पुणे: एक खास सलॉन चेन आणि कंपनी, अ‍ॅप्पल हेअर अँड ब्युटी सर्व्हिसेस प्रा. लिमिटेड ने भारतीय ब्युटी आणि वेलनेस क्षेत्रात सलॉन अ‍ॅप्पल द्वारे प्रवेश केला आहे. .त्यांनी आता २०२१ मध्ये महाराष्ट्रात नवीन फ्रेंचाइजीज , कंपनीच्या मालकीचे सलॉन आउटलेट्स , १९९३ ए सलॉन सुरू केले आहेत. हाऊस ऑफ सलॉन अ‍ॅप्पलच्या -१९९३ ए सलॉन ने अलीकडेच पुण्यातील साळुंके विहार व डीपी रोड येथे त्यांची आउटलेट सुरू केली आहेत. त्यांनी पंढरपूरमध्ये देखील एक आउटलेट सुरू केले आहे. त्यांचे सर्व नवीन ब्युटी आणि लाईफस्टाईल ब्रँड सध्या महाराष्ट्रातील एका मोठ्या झोनसाठी सेवा प्रदान करत आहेत आणि लवकरच त्यांच्या कुशल तंत्रज्ञांसह ते पॅन – इंडियात व ग्लोबल विस्तार करतील, जेथे महिला आणि पुरुषांसाठी हेअर , स्किन, नेल्स , मेकअप, डे स्पा सर्व्हिसेस देतील.
सलॅान ॲपल व १९९३ अ सलॅान कंपनी च्या सी ई ओ मिस प्राची चोपडे या म्हणाल्या
अमेझिंग यू या आपल्या ब्रिद वाक्याने सौंदर्य सेवा पुरवणाऱ्या १९९३ ए सलॉन कंपनीचे उदिष्ट आहे की नियमित सौंदर्य सेवांच्या पलीकडे जाऊन खास सेवा प्रदान करणे सलॉन अ‍ॅप्पल या मूळ कंपनीच्या – १९९३ ए सलॉन सी प्रा. लिमिटेडला आपल्या ग्राहकांना सौंदर्याचे अशे मापदंड प्रदान करायचे आहेत जिथे त्यांना बाहेरूनच नव्हे तर आतून देखील रिफ्रेश वाटेल, आणि ते स्वतःची सर्वोत्तम आवृत्ती बनण्यास सक्षम बनतील. हा एक महत्वाकांक्षी ब्रँड आहे जो अशा लोकांसाठी आहे ज्यांना चांगल्या प्रकारे तयार व्हायला आवडते आणि ज्यांना सर्वोत्तम बनत नेहमी स्वताला पुढे ठेवायचे आहे.

कोविड -१९ आणि लॉकडाऊन नंतर नव्याने सामान्य स्थितीत परतल्यानंतर या १९९३ ए सलॉन कंपनीचे सगळे आउटलेट्स सर्व सरकारी मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करत आहे. यासह, सलॉन टीम सर्व प्रकारचे सुरक्षा नियम जसे सामाजिक अंतर, वारंवार स्वच्छता आणि मर्यादित संख्येने ग्राहक याचेदेखील पालन करत आहे. ज्यामुळे ग्राहक सुरक्षित वातावरणात या सर्व समाधानकारक सौंदर्य सत्रांचा आनंद घेत आहेत.

नयना चोपडे, संस्थापक आणि संचालक (१९९३ ए सलॉन कंपनी ) लॉन्चच्या वेळी बोलताना म्हणाल्या , १९९३ ए सलॉन कंपनीचा असा विश्वास आहे की प्रत्येक व्यक्ती सुंदर जन्माला येते आणि आम्ही फक्त या सुंदरतेत आणखी भर घालण्यासाठी प्रयत्न करतो. ब्युटी व वेलनेसचा हा प्रीमियम ब्रँड सुरू केल्याचा आम्हाला अत्यंत अभिमान आहे आणि आम्ही खुप उत्साही आहोत. आमच्या सौंदर्यसेंवाद्वारे आम्ही प्रत्येकाला दाखऊ इच्छितो की ते किती खास आहेत आणि किती छान दिसु शकतात.