वाढदिवसाचा अनाठायी खर्च टाळून रुत्वाचा वाढदिवस विशेष मुलांमध्ये केला साजरा

735

गिरीश भोपी, पनवेल

बांधिलकी प्रतिष्ठान आयोजित  राजन लोखंडे यांच्या रुत्वा मुलीचा वाढदिवस कळंबोली येथील रत्नमाला कर्णबधीर, मतिमंद विद्यामंदिर येथे १५ ऑगस्ट, २०२१ वार रविवार रोजी साजरा करण्यात आला. स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून शाळेतील मुलांसाठी राजन लोखंडे यांनी मुलांसाठी जेवण, शालेय साहित्याचे कुटुंबासमवेत वाटप केले. तसेच शाळेला देणगी स्वरूपात आर्थिक मदतही केली. त्यांचे मित्र विनोद  म्हात्रे यांनीही मुलांना शालेय साहित्य दिले. यावेळी भाविका राजन लोखंडे, रूत्वा राजन लोखंडे, विनोद आत्माराम म्हात्रे, जयश्री विनोद म्हात्रे, श्लोक विनोद म्हात्रे, श्रुती विनोद म्हात्रे, निखिल सुहास म्हात्रे व पुजा सुहास म्हात्रे कुटुंबीय म्हणून उपस्थित होते.
या कार्यक्रमास शाळेच्या अध्यक्ष माधुरी आंबरेकर, अमोल आंबेरकर, विद्यार्थी व सहकारी उपस्थित होते. तसेच बांधिलकी प्रतिष्ठान अध्यक्ष पल्लवी निंबाळकर, उप सचिव श्वेता भोईर उपस्थित होत्या. माझ्या मुलीचा वाढदिवस योग्य ठिकाणी साजरा झाला याचा मला फार आनंद आहे. रत्नमाला विद्यामंदिरला वेळोवेळी मदत करु असं मत  राजन लोखंडे यांनी व्यक्त केले. आमच्या शाळेला योग्य ती मदत  लोखंडे सरांच्यामार्फत मिळाली याचा आम्हाला आनंद आहे असे मत विद्यामंदिर अध्यक्ष  माधुरी आंबरेकर यांनी व्यक्त केले. अशाप्रकारे हा कार्यक्रम आनंदात साजरा झाला‌