उंड्री पिसोळी कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये राहावे ; राजेंद्र भिंताडे

568

कोंढवा प्रतिनिधी
कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील उंड्री पिसोळी हा परिसर नव्याने होत असलेल्या काळेपडळ पोलीस स्टेशनला हलविण्याचा हालचाली सुरू असून याला उंड्री पिसोळी ग्रामस्थांचा तीव्र विरोध असून यासंदर्भात जनसेवक राजेंद्र भिंताडे यांनी पोलीस उपायुक्त जालिंदर सुपेकर यांना निवेदन दिले आहे.

वास्तविक उंडरी पिसोळी हा परिसर पुणे शहराचा अत्यंत महत्वाचा भाग आहे. कोंढवा पोलीस स्टेशन ह्या परिसरातून अगदी हाकेच्या अंतरावर म्हणजेच दोन किमी वर तर नव्याने होणारे काळे पडळ पोलीस स्टेशन चार ते सहा किमी अंतरावर आहे. काळे पडळ पोलीस स्टेशन चे अंतर जास्त असल्याने नागरिकांना नाहक त्रासाला सहन कारावे लागणार आहे, तसेच वाहतुकीच्या दृष्टीने देखील नवीन पोलीस स्टेशनची हद्द जास्त लांब आहे. तसेच या ठिकाणी जाण्यासाठी नागरिकांना रेल्वे फाटक ओलांडून जावे लागणार आहे यामुळे नागरिकांचा नाहक वेळ व पैसा खर्च होणार आहे आणि कोंढवा पोलीस स्टेशन हे तुलनेने फारच जवळ असल्याने त्वरित पोलीस आयुक्तांनी स्थगिती देत पूर्वीप्रमाणेच उंड्री पिसोळी परिसराची हद्द कोंढवा पोलीस स्टेशनला ठेवावी अशी मागणी राजेंद्र भिंताडे यांनी दिलेल्या निवेदनात केली आहे.
याप्रसंगी भाजपा अध्यक्ष दादासो कड युवा मोर्चा अध्यक्ष अविनाश टकले, ओ बी सी सेल अध्यक्ष ओंकार होले विजय टकले, हनुमंत घुले, शशीकांत पुणेकर, प्रफुल्ल कदम , जलिंदर कामठे ,अक्षय टकले,कैलास पुणेकर, श्रीकांत भिंताडे, सुनील पुणेकर, आकाश टकले, विठ्ठल भिंताडे, सचिन भिंताडे, राजेंद्र होले, विजय चौधरी, विजय कड, प्रकाश होले, दीपक कामठे, उत्तम फ़ुलावरे, रुपेश शेंडकर ,रविंद्र होले व ग्रामस्थ उपस्थित होते