बसस्टॉप अंगावर कोसळून शिवसेना उपशाखाप्रमुख जखमी

747

पुणे प्रतिनिधि,

लष्कर परिसरातील वेस्टर्न थिएटर जवळचा बस स्टॉप आंगावर कोसळून शिवसेनेचे उप शाखाप्रमुख देवेंद्र शिंदे व अन्य दोन व्यक्ती जखमी झाले असून त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना आज 17 ऑगस्ट रोजी दुपारी एकच्या सुमारास घडली आहे,  तर शिंदे हे गंभीर जखमी झाले आहेत.

    पुणे महानगर परिवहन महामंडळाचा “चलता है” म्हणून दुर्लक्षीत केल्यामुळे सामान्य जनतेच्या जिवाशी  हा खेळ सुरू आहे. यासंदर्भात पुणे महानगर परिवहन महामंडळातील हलगर्जीपणा करण्याऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी  व संपूर्ण पुणे शहरातील बस स्टॉपचे स्ट्रक्चर ऑडिट करण्यात यावेत  अशा मागणीचे  पत्र शिवसेनेच्या माध्यमातून पुणे महानगर परिवहन महामंडळाचे  झेंडे  यांना देण्यात आले याप्रसंगी मा. आमदार महादेव बाबर , नगरसेवक तानाजी लोणकर, नगरसेवक सचिन ननावरे, हडपसर विधानसभा प्रमुख राजेंद्र बाबर शाखाप्रमुख शंकर लोणकर प्रसाद बाबर अध्यक्ष आई प्रतिष्ठान उपविभाग प्रमुख सुनील मोरे भरत शेंडकर नितीन लोणकर अनिल जगताप तन्मय बधे व शिवसैनिक उपस्थित होते. पुढील तपास लष्कर पोलीस करत आहेत.