उंड्रीत जेष्ठ नागरिक दिन उत्सहात साजरा

326

कोंढवा प्रतिनिधी

जेष्ठ नागरिक हे आपल्या देशाचे भूषण असून त्यांच्या अनुभव कौशल्याला जगात कुठेच तोड नाही असे प्रतिपादन जनसेवक राजेंद्र भिंताडे यांनीं उंड्री येथील
अस्टोनिया क्लासिक सोसायटीमधील जेष्ठ नागरिकांच्या सत्कार समारंभावेळी केले.
जेष्ठ नागरिक दिनानिमित्त राजेंद्र भिंताडे व मित्र परिवाराच्या वतीने जेष्ठ नागरिकांचा पुष्पगुच्छ , श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी राज्य कामगार महामंडळ माजी अधिकारी दिलीप शहा यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच प्रगतिशील शेतकरी बाळासाहेब शितोळे यांनी देखील आपले मनोगत याप्रसंगी व्यक्त केले. याप्रसंगी राहुल पाटील, अभिजित शिरोडे, सचिन पुणेकर, दादा कड, अविनाश होले, अक्षय टकले , विठ्ठल भिंताडे, श्रीकांत भिंताडे, शशिकांत पुणेकर, अक्षय फुलावरे आणि जेष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते