उंड्री-पिसोळी ग्रामपंचायतीच्या उदासीनतेमुळे तीस वर्षांपासून रखडलेला रस्ता स्वखर्चाने बनविला

886

कोंढवा प्रतिनिधी ,

उंड्रीतील भिंताडेनगर ते कामठे -भिंताडे आळी या उंड्री-पिसोळी दोन्ही ग्रामपंचायतीच्या वेशीवर असलेला रस्ता दोन्ही ग्रामपंचायतीच्या अनाकोंदी कारभार आणि उदासीनतेमुळे रखडला होता. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखलाचे साम्राज्य होते , यामुळे येथील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र भिंताडे यांनी स्वखर्चाने हा रस्ता बनिवण्यास सुरुवात केली आहे.
खरतर उंड्री-पिसोळी दोन्ही ग्रामपंचायतीच्या वेशीवर भिंताडेनगर ते कामठे -भिंताडे आळी येथे राहाणाऱ्या स्थानिक ग्रामस्थांसाठी हा रस्ता आहे. आता लोकसंख्या वाढल्यामुळे रस्त्यावर रहदारी सुद्धा वाढली आहे. गेली तीस वर्ष या दोन्ही ग्रामपंचायतीने येथे दुर्लक्ष केले होते. येथील स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी दोन्ही ग्रामपंचायती कडे वारंवार पत्रव्यव्हार केला होता, परंतु त्यांनी दखल घेतली नाही. अखेर रोजच चिखलातून जावे लागत असल्याने नागरिकांनी जनसेवक राजेंद्र भिंताडे यांच्याकडे आपली कैफियत मांडली. त्यांनी त्वरित या रस्त्याचे काम स्वखर्चाने सुरु केले असून लवकरच एक चांगला रस्ता आपण तयार करत आहोत असे आश्वासन स्थानिक नागरिकांना दिले. याप्रसंगी काशीनाथ भिंताडे , विजय कड, उत्तम कामठे या जेष्ठ नागरिकांच्या हस्ते रस्त्याचे भूमिपूजन करून काम सुरु करण्यात आले. यावेळी , दादा कड, अविनाश टकले , ओंकार होले, अक्षय टकले ,विश्वास भिंताडे, निखिल लोणकर, मयूर कामठे,आकाश होले , तुषार भिंताडे, श्रीकांत भिंताडे, मयूर होले, विठ्ठल भिंताडे, अजय कामठे, प्रेम भिंताडे , राहुल भिंताडे, सचिन भिंताड़े ,रवींद्र होले, संकेतभिंताडे,नितीन लोणकर,
निलेश भिंताडे,महेश भिंताडे,अरुण भिंताडे,शिवाजी भिंताडे, सौरभ भिंताडेआदी उपस्थित होते.