ब्रह्ममूहुर्त योग ज्ञानपीठ केंद्राला देवमाणूस मालिकेतील कलाकारांची भेट

653

सर्वानी नियमित व्यायाम करून आरोग्य निरोगी राखावे : पुष्पा चौधरी

अनिल चौधरी, पुणे
नियमित योगासने केल्यामुळे हृदयावरील ताण, रक्तदाब आणि पर्यायाने हृदयरोग सुधारण्यास मदत होते. प्राणायाम म्हणजेच श्वसनाचे व्यायाम हे आपल्या मेंदूचे हृदयावरील नियंत्रण वाढवण्यास मदत करतात. प्राणायामामुळे हृदयाची इस्केमिया सहन करण्याची क्षमता वाढते, योगा हा दररोज किमान एक तास तरी केला पाहिजे आणि बाकीच्या वेळेस श्वासावर नियंत्रण ठेवलं पाहिजे , आहारावर नियंत्रण ठेवल्यास वजन कमी करण्यास मदत होते तसेच सर्वानी नियमित व्यायाम केल्याने आरोग्य निरोगी राखावे असे मत झी मराठी या वाहिनीवरील प्रसिद्ध मालिका देव माणूस मधील अभिनेत्री वंदू आत्या म्हणजेच पुष्पा चौधरी यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी मालिकेतील काही महत्वाचे डॉयलॉग साधकांना एकविले. याप्रसंगी अभिनेत्री डिम्पल म्हणजेच अस्मिता देशमुख आणि मालिकेचे एकक्सिक्युट प्रोड्युसर सागर उपस्थित होते.

ब्रह्ममूहुर्त योग ज्ञानपीठ केंद्र हे एकमेव असे केंद्र आहे जे पुणे शहरातील विविध भागात मोफत योगासने आणि विविध व्यायाम प्रकार शिकवले जातात. यातील कोंढवा हॉल याठिकाणी कलाकारांच्या भेटीने एक वगेळेच वातावरण तयार झाले होते , प्रचंड उत्सहात, जल्लोषात अनेक व्यायाम प्रकार आणि झुंबा डान्स घेण्यात आले. याला साधकांनी आणि कलाकारांनी उत्फुर्त साथ दिली. याप्रसंगी केंद्राचे अध्यक्ष आनंदाससर , अश्विनी पासलकर, सासवड नगरपालिकेचे स्वीकृत नगरसेवक सागर जगताप आणि सासवड मधील साधक , मा. नगरसेवक तानाजी लोणकर, सुधीर गरुड, राजेंद्र भिंताडे, कोचर प्रतिभा मोरे, रवींद्र औटी, विजय लोणकर, कालिदास लोणकर, अनुजा लोणकर, उर्मिला भालेराव, संतोष गोरड आदी उपस्थित होते