Friday, March 21, 2025
Google search engine
HomeMalhar Newsउंड्रीत आरोग्य शिबीर व शिक्षकदिन उत्साहात साजरा

उंड्रीत आरोग्य शिबीर व शिक्षकदिन उत्साहात साजरा

कोंढवा प्रतिनिधी

गुरु-शिष्य परंपरा भारतीय संस्कृतीमधील एक महत्त्वपूर्ण आणि पवित्र भाग आहे. आपल्या संस्कृतीत आईनंतर दुसरं महत्त्वाचं स्थान असतं ते गुरूला. आपल्या जीवनाला दिशा देण्यात आणि आपली जडणघडण करण्यात गुरूचा वाटा खूप मोठा असतो. त्यामुळेच आपल्याकडे शिक्षक दिनाला विशेष महत्त्व आहे. व्यक्ती आणि समाजाच्या विकासात शिक्षणाचा वाटा मोलाचा आहे. जिथे शिक्षण आहे तिथेच विकास आहे, म्हणूनच शिक्षणातून व्यक्तीची जडणघडण करणाऱ्या शिक्षकाचा आदर करण्याचा हा दिवस असतो असे जनसेवक व भाजपा युवा नेते राजेंद्र भिंताडे यांनी शिक्षकांचा सत्कार करताना आपले मत व्यक्त केले.
आजच्या धकाधकीच्या जीवनात घर आणि कार्यालयीन कामकाजाचा भार वाढल्याने धावपळ, दगदग, ताणतणाव इत्यादींमुळे सातत्याने आरोग्यविषयक तक्रारी निर्माण होत असतात, मात्र अनेकदा वैद्यकीय तपासणी करण्यास चालढकल होत असल्याने रोगांचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते याच उद्देशाने श्री. विश्वागंद आयुर्वेदिक क्लिनिक आणि पंचकर्म सेंटर व बी. एल मानकर बहुउद्देशीय सामाजिक संस्था आणि उंड्री भाजपा यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत अयोग्य तपासणी व उपचार शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी उपस्थितींना मार्गदर्शन करताना जालिंदर कामठे म्हणाले, आज शिक्षक दिन असून आजच नागरिकांना मोफत आरोग्य तपासणी व उपचार व औषधोपचार आयोजित केल्याने नागरिकांना ह्याचा मोठा फायदा होणार आहे. डॉ मानकर पती पत्नी नेहमीच असे नागरिकांना मोफत शिबिरे आयोजित करत असून खऱ्या अर्थाने समाजाची सेवा करत आहेत.
या शिबिरात प्रामुख्याने वातविकार व्यसनमुक्ती आणि इतर सर्व आरोग्यविषयक शंका निरसन व औषधोउपचार याबाबत सदर शिबिरात तपासणी मार्गदर्शन डॉ.बाळासाहेब मानकर व वर्षा मानकर यांनी केले .नागरिकांच्या आरोग्यविषक दैनंदिन तक्रारींवर उपयुक्त माहिती देऊन आहार व व्यायाम इत्यादीवर डॉ.मानकर यांनी प्रकाश टाकला. याप्रसंगी दोनशे नागरिकांनी या मोफत आयुर्वेदिक शिबिराचा लाभ घेतला.


याप्रसंगी भाजपा प.महा.अध्यक्ष जालिंदर भाऊ कामठे, नगरसेविका रंजना टिळेकर, गणपत दगडे,राहुल शेवाळे, धंनजय कामठे, अविनाश टकले, दादा कड, सचिन हांडे, डॉ अश्विन खिलारे, डॉ.तेजस्विनी अरविंद , सूरज बीरे,ओंकार होले, अक्षय टकले, राजेंद्र होले, कैलास पुणेकर, हनुमंत घुले, बी एल मानकर बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे सचिव सुनिल साहू ,खजिनदार स्वप्नील जगताप,शशिकांत पुणेकर, विजय कड, श्रीकांत भिंताडे, विठ्ठल भिंताडे, तुषार भिंताडे, प्रकाश होले, प्रेम भिंताडे, आबा घुले, अंकुश घुले, विजय आल्हाट, निलेश भिंताडे, सचिन भिंताडे, योगेश भिंताडे, लालचंद भिंताडे, पप्पू जाधव, देवानंद लोणकर, संतोष गोरड आदी उपस्थित होते तसेच दत्तात्रय होळकर व अविनाश टकले यांनी सूत्रसंचालन केले तर आभार दादा कड यांनी मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!