कोंढवा येथील संकट हरण महादेव मंदिरात श्रावणी शिवभंडारा संपन्न

535

कोंढवा प्रतिनिधी,

कोंढवा खुर्द येथील जागृत आणि भक्तांच्या नवसाला पावणारे प्राचीन संकट हरण महादेव मंदिरात श्रावणी शिवभंडारा मोठ्या उत्सहात संपन्न झाला. पहाटेपासून रुद्र अभिषेक व रुद्र स्वाहाकार व होम हवन वेदमूर्ती विजय पुजारी यांनी केले. मंदिराचे विश्वस्त तानाजी लोणकर यांनी आलेल्या सर्व कोंढवा खुर्द ग्रामस्थ व पाहुण्यांचे स्वागत केले.

याप्रसंगी मंदिराच्या आवारामध्ये शिवलिंग कलाकार दीपक घोलप यांनी जगातील पहिले नाण्यांपासून बनविलेले शिवलिंग दर्शानासाठी नागरिकांनी ठ्वले होते. या नाण्यांपासून बनविलेल्या शिवलिंगामध्ये २२३०१ नाणी वापरली होती. यामध्ये २ रुपयांची १४९१६ नाणी, ५ रुपयांची ४८७५ आणि १०रुपयांची २५१० नाणी वापरली असून याची किमंत ७९,३०७ रुपये आहे. याबद्दल शिवलिंग कलाकार दीपक घोलप यांचा कोंढवा खूर्द ग्रामस्थ व मंदिर ट्रस्ट च्या वतीने सत्कार करण्यात आला. तर त्यांच्या पराक्रमाची नोंद ग्रिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झाली असून त्यांना पुढील वाटचालीसाठी कोंढवा खुर्द ग्रामस्थ व मंदिर ट्रस्ट चे विश्वस्त तानाजी लोणकर यांनी शुभेच्छा देण्यात आल्या.

याप्रसंगी महिलांसाठी मंगळागौर चा कार्यक्रम देखील ठेवण्यात आला होता. यामध्ये सर्व महिलांनी उस्फुर्तपणे सहभाग घेऊन अतिशय आंनदात हा कार्यक्रम साजरा केला. यावेळी सर्व नागरिकांसाठी महाप्रसादचे आयोजन केले होते याचा नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. यावेळी कोंढवा खुर्द ग्रामस्थ, विविध राजकीय पक्षांचे नेते, अधिकारी , उंड्री , पिसोळी तसेच संपूर्ण पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते तर केटरिंग व्यवस्था अन्नपूर्ण केटरिंग चे व्यवस्थापक सांतोष थामी यांनी पाहिली.