गाड्या फोडण्याचे लोन आता कोंढव्यात ; कठोर कारवाईची नगरसेविका नंदा लोणकर यांची मागणी

795

कोंढवा प्रतिनिधी,

पुणे शहरात विविध ठिकाणी गाड्या फोडल्या जात होत्या  यानंतर पुणे पोलिसांनी या विकृत आरोपींवर कठोर कारवाई करून त्यांच्या मुसक्या आवळल्या होत्या, यामुळे पुणे परिसरातील गाड्या फोडण्याचे प्रमाण कमी झाले.पण आज कोंढवा परिसरातील एनआयबीएम साळुंखे विहार लिंक रोड येथील नानक सोसायटी, राहुल रेसिडन्सी, लायशा एनकलेव्ह , ग्रीन एकर सोसायटी आणि वानवडी परिसरातील सात गाड्या दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञात इसमानी फोडल्या. याची माहिती स्थानिक नागरिकांनी नगरसेविका नंदा लोणकर यांना देताच त्यांनी ताबडतोब घटना स्थळाला भेट देऊन, त्यांनी त्वरित याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याना देऊन या विकृत आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे.


वास्तविक वानवडी परिसर हा उच्चभ्रू असा आहे. नागरिक पै पै करून महागड्या घेत असतात. परंतु काही समाजकंटक अशा गाड्या कोणताही विचार न करता फोडतात , अशा विकृतांवर कठोर कारवाई करून अशी हिम्मत पुन्हा कोणी करणार नाही असा धाक कोंढवा पोलिसांनी ठेवला पाहिजे. घटनेची माहिती मिळतातच वानवडी विभागाच्या डीसीपी नम्रता पाटील, नगरसेविका नंदा लोणकर, कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील व पोलीस कर्मचारी यांनी भेट देऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत, याबाबत काही महत्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत असे , सरदार पाटील यांनी सांगितले आहे.
वास्तविक कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुन्हा घडल्याने पोलिसांनी आक्रमक भूमिका घेऊन अशा विकृत आरोपींवर कठोरातील कठोर कारवाई केली पाहिजे असे मत स्थानिक नागरिक करत आहेत, त्यामुळे आता कोंढवा पोलिस आरोपींना कधी अटक करणार ,याची नागरिक वाट पाहत आहे.पुढील तपास कोंढवा पोलीस करत आहे.