कोंढव्यात पित्याचा पोटच्या मुलीवर सात वर्षांपासून अत्याचार

938

कोंढवा प्रतिनिधी,

कोंढव्यात तेरा वर्षाच्या मुलीवर गेल्या सात वर्षांपासून नराधम पिता अत्याचार करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पित्याला कोंढवा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
याबाबत 13 वर्षीय पिडीत मुलीच्या वतीने तिच्या शाळेच्या शिक्षीकेने कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार पिडीत मुलीने तिच्या शाळेच्या शिक्षकेला सांगितल्यानंतर उघडकीस आला आहे.
याप्रकरणी धक्कादायक एकच खळबळ उडाली आहे. त्यानंतर संबंधीत शिक्षीकेने एका समुपदेशकामार्फत माहिती घेतल्यानंतर धक्कादायक प्रकार समोर आला.
नराधम पिता मुलगी सहा वर्षाची असल्यापासून तिच्यावर अत्याचार करत असल्याचे समजले. दाखल गुन्ह्यातील फिर्यादीनंतर पित्याला अटक करण्यात आली असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सरदार पाटील यांनी सांगितले.