राष्ट्रीय कार रॅलीत निकिता नितीन टकलेचे घवघवीत यश

334

तीन क्लास मध्ये प्रथम – वयाच्या 21 व्या वर्षी मिळविल्या आठ ट्रॉफी

पुणे (प्रतिनिधी)

वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी कार रॅलीत सहभागी होत पदार्पणातच आठ ट्रॉफी जिंकणाऱ्या निकिता नितीन टकले या नवोदित रायडरने तीन क्लास मध्ये प्रथम व एकूण आठ ट्रॉफी मिळवण्याचे यश संपादन केले आहे.
निकीताच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

एच. डी. एफ. सी बँकेच्या वतीने आयोजित टाइम अटॅक राष्ट्रीय  कार रॅलीचे आयोजन वाघोली, महालक्ष्मी लॉन येथे करण्यात आले होते.
या रॅलीत हैद्राबाद, बेंगलोर, चेन्नई, मुंबई, दिल्ली, नागपूर, पुणे, कोल्हापूर या भागातून 185 कार रायडर सहभागी झाले होते. या रॅलीत वरून लाल, ध्रुव चंद्रशेखर, माझदयार वाछा, ख्याती मोदी, संजय लाल, प्रदीप नायर आदी दिग्गज रायडरसह महिलांचा सहभाग असताना निकिताने पदार्पणातच यश मिळवून सर्वांचे लक्ष वेधले आहे.
या रॅलीत डर्ट रेस होती, प्रत्येकाला दोन राउंड दिले होते, अतिशय खडतर असा मार्ग असताना मिळालेल्या संधीचे सोने करत निकिता नितीन टकले या रायडरने 3 मिनिटं 22 सेकंद मध्ये राउंड पूर्ण केला. प्रथम रायडर ने 10 तर निकीताने एकूण चौदा क्लास होते त्यातील 10 मध्ये सहभाग घेतला आणि 8 क्लासमध्ये ट्रॉफी मिळवली आणि प्रो लेडीज क्लास, अमेचर लेडीज क्लास, आणि एकूण स्पर्धेत मिळविलेल्या यशाबद्दल
मध्ये प्रथम क्रमांकाची ट्रॉफी देऊन सन्मान केला.
विजेत्या निकिता या स्पर्धकास कारपटू आयोजक चेतन शिवराम, आंतरराष्ट्रीय कारपटू संजय टकले, एच. डी. एफ. सी. चे चेअरमन यांच्या हस्ते  ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.
कार रॅली चे आयोजन दिग्गज कारपटू चेतन शिवराम यांनी एच.डी. एफ. सी च्या सहयोगाने केले होते.

आंतरराष्ट्रीय स्तरावर रॅलीत खेळण्याचे स्वप्न…
निकिता नितीन टकले या कारपटूने भारतात दोन स्पर्धात भाग घेऊन उल्लेखनीय यश मिळविले आहे, आंतरराष्ट्रीय कारपटू संजय टकले, वडील नितीन टकले यांच्या प्रेरणेने पुढील काळात आंतरराष्ट्रीय पातळीवर कार रेसमध्ये सहभागी होत भारताचा तिरंगा जगाच्या पातळीवर फडकविण्याचा मानस निकीताने बोलताना व्यक्त केला. राहुल संचेती, प्रफुल संचेती यांचे मार्गदर्शन लाभल्याचे निकिता आवर्जून म्हणाली.