रोटरी क्लब ऑफ पुणे गांधीभवन तर्फे शेतकऱ्यांना सोलर ड्रायरची मदत

415

 

पुणे प्रतिनिधी,

रोटरी क्लब ऑफ पुणे गांधीभवन तर्फे शेतकऱ्यांना सोलर ड्रायरची, ग्रामीण भागातील शाळेला बाकडयांची मदत देण्यात येणार आहे.कोथरूडमधील गांधी भवन येथे बुधवारी १० नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता होणाऱ्या कार्यक्रमात प्रांतपाल पंकज शाह यांच्या हस्ते ही मदत देण्यात येणार आहे.रोटरी क्लब ऑफ पुणे गांधीभवन चे अध्यक्ष मनीष धोत्रे, प्रकल्प समन्वयक वैशाली भागवत यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. ग्रामीण तंत्रज्ञान संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत सोलर ड्रायर देण्यात येणार आहेत. अतिरिक्त कृषी उत्पन्नावर प्रक्रिया करण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे. ६ शेतकऱ्यांशी यासंदर्भात सहकार्य करार केला जाणार आहे.इनामगाव ( जिल्हा पुणे ) या गावातील शाळेतील विद्यार्थ्यांना बसायला बाकडी देण्यात येणार आहेत. सरपंच पल्लवी घाडगे त्या साठी उपस्थित राहणार आहेत.