दीपक बुंदेले यांना पत्रकारिकेत डॉक्टरेट पदवी , अमेरिकन विद्यापीठाने केले सन्मानित

914

पुणे प्रतिनिधी,

साऊथवेस्टर्न अमेरिकन विद्यापीठाने पुण्यातील प्रसिद्ध सिने-पत्रकार, चित्रपट-समीक्षक, विश्व-विक्रमवीर दीपक बुंदेले यांना पत्रकारिकेत पीएचडी प्रदान केली.
दीपक बुंदेले ह्यांनी पदवी स्वीकारताना आनंद व्यक्त केला सदरील समारोह मुंबईतील हॉटेल ताज पॅलेस येथे संपन्न झाला, साऊथवेस्टर्न अमेरिकन विद्यापीठाचे प्रमुख सल्लागार जेपीयू जॉन पीटर ह्याच्या हस्ते दीपक बुंदेले ह्यांना डॉक्टरेट प्रदान करण्यात आली सदरील कार्यक्रमास प्रा.डॉ. दिनेश गुप्ता, डॉ. अनिता गुप्ता, डॉ. संदीप सिंह व डॉ. योगेश जोशी ही उपस्थित होते.
पुण्यातून प्रसिध्द होणाऱ्या जवळपास सर्वच वृत्तपत्रातून दीपक बुंदेले ह्यांचे अनेक लेख प्रसिद्ध झाले आहेत,ह्यातूनच त्यांना आधीही पत्र-मित्र पुरस्कार, युवा -भारत पुरस्कार, केंद्र सरकार कडून सुवर्ण-जयंती पदक असे अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत तसेच त्यांच्या नावावर आठ विश्वविक्रम व एक राष्ट्रीय विक्रमाचाही नोंद आहे दूरचित्रवाणी व रेडिओ वर ही त्याच्या अनेक मुलाखती प्रक्षेपित झालेल्या आहेत.