ब्रम्हमुहूर्त योग ज्ञानपीठ केंद्राच्या योग शिबिरास पुणेकर नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

1118

कात्रज/पुणे

ब्रम्हमुहूर्त योग ज्ञानपीठ केंद्र आणि संदीप बेलदरे पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने कात्रज आंबेगाव मधील आरोह मंगल कार्यालयात सुरू असलेल्या सात दिवशीय आरोग्य योग शिबिरास पुणेकर नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून शिबिराच्या चौथ्या देखील जवळपास 1400 नागरिकांची नोंदणी झालेली पहायला मिळत आहे. शिबीर ब्रम्हमुहूर्तावर म्हणजेच पहाटे साडेचार वाजता सुरू होत असून देखील नागरिक पहाटे साडेतीन ते चार वाजता रांगेत उभे राहून सर्वात पुढे राहण्यासाठी रांगा लावत आहे.यावेळी योगाचार्य श्रीदीपक महाराज साधकांना मार्गदर्शन करत आहेत

कात्रज, आंबेगाव,  नऱ्हे ,दत्तनगर येथील नागरिकांसाठी त्यांच्या आरोग्यासाठी सामाजिक कार्यकर्ते आणि उद्योजक संदीप बेलदरे पाटील यांनी केंद्राचे साधक सुधीर गरड यांच्याकडे शिबिराबाबत विचार मांडला , त्यांनीही त्वरित प्रतिसाद देत शिबीर चालू केले.

शिबिराचे खास वैशिष्ट्य म्हणजे पहाटे सुरू होणारे मोफत आरोग्य शिबीर होय..पहाटे 3 वाजल्यापासून साधक
नागरिकांच्या सेवेस उपस्थित असतात. प्रचंड शिस्तीत केंद्राचे काम सुरू असते. महिला व पुरुषांची वेगवेगळ्या रांगा लावणे , पार्किंग सेवा, मस्तकी गंध लावणे , हाताला अत्तर लावणे , महिला आणि पुरुषांना योगासाठी वेगवेगळ्या ठिकाणी व्यवस्थित रांगेमध्ये बसविणे. साधकांनी उत्तम सेवा नियोजन केले होते त्यामुळे एवढ्या गर्दीमध्ये कुठेही गडबड गोंधळ होत नव्हता. यानंतर गुरुवर्य योगाचार्य साधकांना मार्गदर्शन करता करता सर्व साधकांच्याकडून विविध प्रकारचे वॉर्म अप एक्सरसाईज शिस्तबद्ध पद्धतीने करवून घेत होते व त्यांना यंग स्टार कोचर टीम साथ देत होती. प्राणायाम व क्लापिंग एक्सरसाईज , मेडिटेशन गुरुदेव नागरिकांकडून करवून घेत होते. यावेळी गुरुदेव दिपजी साधकांना उपदेश देत म्हणाले आपले शरीर हेच साक्षात परमेश्वर असल्याची जाणीव सर्वांना करून दिली व देव कसा व कशात शोधावा याचे अमूल्य असे मार्गदर्शन केले. निरोगी व आनंदी जीवन जगण्याच्या कलेचबाबत देखील माहिती दिली.
एकंदरीत नागरिकांना रोज वेगवेगळे योग प्रकार, मेडिटेशन, प्राणायम गुरुदेव आपल्या साधकांकडून करवून घेत असतात. एकंदरीत शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद नागरिकांनी दिलेला पहायला मिळत आहे.