अर्निका ट्रस्ट ची कर्णबधिर जेष्ठ महिलेस मदत ;श्रवणयंत्र दिल्याने महिलेच्या चेहऱ्यावर हसू फुटले

263

अनिल चौधरी , कोंढवा पुणे

सोळी येथील अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत जीवन जगणाऱ्या राधा पाडाले (वय ७२ वर्ष ) ह्या जेष्ठ नागरिक महिलेला गेल्या दोन वर्षांपासून ऐकायला येत नव्हते. त्यात घरची परिस्थिती हालाकीची असल्याने महागडे श्रावणयंत्रे तसेच तज्ञ डॉक्टरांना दाखवण्यात अडचणी येत होत्या. याबाबतची माहिती अर्निका चॅरिटेबल चे अध्यक्षा डॉ रसिका लोणकर यांना मिळताच त्यांनी त्वरित सदर महिलेची भेट घेऊन कर्ण तज्ञ डॉक्टर कडून तपासण्या करून  श्रवणयंत्रे  महिलेला उपल्बध करून दिल्याने त्याना ऐकण्यास आल्याने पाडाले यांच्या चेहऱ्यावर हसू फुटले. याकामी त्यांना निखिल लोणकर व नवनाथ गोते यांनी मदत केली.

अर्निका चॅरिटेबल ट्रस्ट समाजातील गोर गरीब, अनाथ जेष्ठ नागरिक तसेच इतर लोकांना नेहमी मदत करत असते . समाजातील नागरिकांना काही मदत लागल्यास त्यांनी आमच्या अर्निका चॅरिटेबल ट्रस्ट , कृष्ण केवल नगर येथील ऑफिसशी संपर्क करण्याचे आवाहन डॉक्टर रसिका, निखिल लोणकर यांनी केले आहे. दरम्यान पिसोळी येथील जेष्ठ नागरिक महिलेला मदत केल्याने लोणकर परिवाराचे पंचक्रोशीत कौतुक होत आहे