विविध उपक्रमांनी मा.आ.महादेव बाबर यांचा वाढदिवस साजरा

1174

मल्हार न्यूज विशेष :-                                                                                                                      मा.आमदार महादेव बाबर यांच्या वाढदिवसानिमित्त आज कोंढवा येथे शिवसेना शाखेजवळ शासन आपल्या दारी, रुग्णवाहिकेचे लोकार्पण, मोफत पीयूसी, चित्रकला स्पर्धा, अल्पोपहाराचे आयोजन करण्यात आले. प्रसाद बाबर यांनी या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. संध्याकाळी न्यू होम मिनिस्टर , खेळ पैठणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये अॅक्टीव्हा, टीव्ही, फ्रीज, मिक्सर तसेच इतर बक्षिसांची लयलूट महिलांसाठी खास ठेवली आहे.        मा.आमदार महादेव बाबर यांच्या वाढदिवसानिमित्त आज शासन आपल्या दारी उपक्रमा अंतर्गत डोमिसाईल सर्टिफिकेट , उत्पनाचा दाखला, एसटी पास सवलत, जेष्ठ नागरिक दाखला, रेशनकार्ड मधील नावे कमी करणे, नाव वाढविणे, नवीन रेशन कार्ड काढणे, तसेच आधारकार्ड नवीन काढणे, त्यामध्ये बदल करणे, मोफत नेत्रचिकित्सा, औषधे, रक्ततपासणी आदि नागरिकांसाठी मोफत ठेवण्यात आले होते. नागरिकांनी या उपक्रमाला भरपूर मोठ्या प्रमाणात दाद दिली असून महादेव बाबर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा व आशीर्वाद देण्यात आले. रुग्णवाहिकेचे लोकार्पण कोंढवा परिसरातील सर्व जेष्ठ ह.भ.प. तसेच भजनी मंडळींच्या हस्ते करण्यात आले तर सामाजिक कार्यकर्ते विलास कापरे यांच्या हस्ते मोफत पियुसीचे उदघाटन करण्यात आले.                        यावेळी पुणे शहरातील शिवसेनेचे सर्व नेते, सर्वपक्षीय नेते, मनपा कामगार , रिक्षाचालक, नागरिक, तसेच पुणे शहारातील विविध नागरिकांनी तसेच विरोधी पक्षांच्या नेत्यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन, फोन द्वारे त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे आयोजन प्रसाद बाबर यांनी केले होते तर सूत्रसंचालन प्रो.निलेश बढेसर यांनी केले.