रस्त्याच्या कामाकडे लक्ष वेधण्यासाठी मनसेचे अनोखे आंदोलन

735

मल्हार न्यूज, कोंढवा प्रतिनिधी

गेल्या नऊ महिन्यांपूर्वी मोठ्या उत्साहात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बहुचर्चित काञज कोंढवा रोडचे भूमिपूजन झाले होते.परंतु या कालावधीत याठिकाणी रस्ते खोदाई व्यतिरिक्त कुठलेही काम झाले नाही याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नगरसेवक वसंत मोरे आणि साईनाथ बाबर यांनी या रस्तेखोदाई असलेल्या ठिकाणी पावसाचे पाणी साचले असल्याने त्यामध्ये बोट चालवून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

यावेळी नगरसेवक वसंत मोरे आणि साईनाथ बाबर म्हणाले की, गेल्या ९ महिन्यांपासून या रस्त्याचे काम अत्यंत धिम्यागतीने सुरू आहे. पावसाळा असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.कात्रज कोंढवा रस्ता मोठ्या रहदारीचा असून वाहनचालकांना वाहतूक कोंडीने मनस्ताप सहन करावा लागतो, तसेच पादचाऱ्यांना आपला जीव मुठीत धरुन चालवत लागते. पण पालिका प्राशासन या रस्त्याचे काम कधी पूर्ण करणार असा प्रश्न देखील उपस्थित केला.याप्रसंगी मनसे कार्यकर्त्यांनी काञज कोंढवा रोडला गाडी चालो या ना चालो पण बोट नक्की चालली अशा घोषणा देखील दिल्या.
    याप्रसंगी स्थानिक आमदार योगेश टिळेकर यांच्याची संपर्क  करण्याचा प्रयत्न केला असता तो झाला नाही.