यशाबरोबर नम्रतेची जोड आवश्यक- विकास खन्ना

623

एल्प्रो इंटरनॅशनल स्कूल तर्फे आयोजित फिएस्टा फॅंटसीचा- वार्षिक आनंदमेळा उत्साहात संपन्न

सेलिब्रेटी शेफ विकास खन्ना यांचे बहुप्रतीक्षित पुस्तक ‘अ ट्री नेम गंगा’ चे प्रकाशन

पुणे प्रतिनिधी,

जे एल्प्रो इंटरनॅशनल स्कूलतर्फे एल्प्रोसिटी स्क्वेअर मॉल येथे आयोजित पुणे येथील सर्वात मोठा विद्यार्थी आनंदमेळा ‘फिएस्टा फॅन्टासिया’ अतिशय उत्साहात व प्रचंड प्रतिसादात संपन्न झाला. या आनंद मेळ्यात विविध क्रियालापांचे एकूण ५० स्टॉल होते. यात विद्यार्थी पालक व शिक्षक यांना एकाच व्यासपीठावर आणून त्यांचे संबंध अधिक घट्ट करणे हा उद्देश होता. या मेळाव्यात फ्लॅश मॉब, फेस पेंटिंग, टॅटू बनविणे आणि इतर अनेक कला व हस्तकला कामांचा समावेश करण्यात आला होता.

संपूर्ण कार्यक्रमात  सर्व वयोगटातील लोक विविध उपक्रमांमध्ये भाग घेताना दिसले तसेच अतिशय मोठ्या संख्येने विद्यार्थी पालक व अन्य लोकांनी या मेळाव्यास भेट दिली. या शिवाय शिक्षा फाउंडेशन च्या १०० मुलांनी देखील या मेळाव्यास भेट दिली व या मेळाव्याचा आनंद लुटला.

या आनंदात भर घालण्यासाठी, सेलिब्रिटी शेफ, विकास खन्ना यांनी फिएस्टा फॅन्टासिया येथे ‘ए ट्री नेम गंगा’ हे त्यांचे बहुप्रतिक्षित पुस्तक लॉन्च केले.  हे पुस्तक एका बियाण्याच्या कथेभोवती फिरते जे प्रत्येकाच्या प्रेमामुळे आणि समर्थनाने गंगा नामक एका भव्य झाडामध्ये रूपांतरित होते. परंतु नंतर या झाडास गर्व चढतो व ती एकाकी पडते. विकास खन्ना हे जगातील एकमेव शेफ आहे ज्यांनी मुलांसाठी एक स्टोरी बुक लिहले आहे. या कार्यक्रमात उपस्थित सर्व व्यक्ती आणि विद्यार्थी विकास खन्ना ला भेटून भारावून गेले. विकास खन्नाने देखील सर्व चाहत्यांशी बोलून त्यांची मने जिंकली.

पुस्तकाबद्दल बोलताना विकास खन्ना म्हणतात, “‘ ए ट्री नेम गंगा ’ही जीवन, मैत्री आणि नम्रतेची कथा आहे जी मुलांना आणि पालकांना समान प्रेरणा देईल. मी हे पुस्तक वाराणसीतील गंगा घाटांवर लिहिले आहे, गंगेच्या किनाऱ्यावरील भव्य झाडे जीवनाचा प्रसार करणारी भव्य झाडे बघून मला हे पुस्तक लिहण्याची प्रेरणा मिळाली. हे पुस्तक उदय एस. अहलावत, रॉबर्ट कोहेन आणि जकार्याटेलर – या तीन लोकांना मी समर्पित करतो ज्यांनी माझ्या आयुष्यात महत्वाचे योगदान दिले आहे. एफिएस्टा फॅन्टासिया या सुंदर कार्यक्रमात हे पुस्तक प्रकाशित करण्याची संधी दिल्याबद्दल मी एल्प्रो सिटी स्क्वेअर मॉल आणि एल्प्रो इंटरनॅशनल स्कूलचे आभार मानतो. माझी आशा आहे की हे पुस्तक मुलांच्या पसंतीस पडेल व त्यांना प्रेरणा मिळेल.”

एलिप्रो इंटरनेशनल लिमिटेड चे अध्यक्ष व एमडी श्री दीपक कुमार  “फिएस्टा फन्टासियाच्या भव्य यशाबद्दल बोलताना म्हणाले,” एल्प्रो सिटी स्क्वेअर मॉलमध्ये फिएस्टा फॅन्टासिया या मेळाव्याचे आयोजन करणे आमच्यासाठी अतिशय आनंदाची बाब होती.  विद्यार्थ्यांना कौशल्य व उत्साह  पाहून आम्हाला आश्चर्य वाटले. हा मोठा प्रतिसाद पाहून आम्ही भारावून गेलो.शेफ विकास खन्ना खरंच या कार्यक्रमाचे  आकर्षण होते. त्याच्या उपस्थितीने या कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली त्यांच्या या नवीन पुस्तकाबद्दल आम्ही त्यांना मनापासून शुभेच्छा देतो.”

एल्प्रो इंटरनॅशनल स्कूलच्या संचालिका प्राचार्य डॉ. अमृता वोहरा म्हणाल्या, “फिएस्टा फॅन्टासिया हा वर्षातील सर्वात विलक्षण कार्यक्रम आहे. विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि कर्मचार्‍यांना एकाच व्यासपीठावर एकत्र आणण्यासाठी वार्षिक कार्निव्हल ही संकल्पना प्रथम २००३ मध्ये सादर केली गेली होती. तेव्हा पासून हा कार्यक्रम सर्वासाठी जिव्हाळ्याचा विषय आहे. २०२० चा हा कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला, विविध कार्यक्रमासह फूड विभागाला मिळालेला प्रतिसाद वाखाणण्याजोगा होता.”