शासन आपल्या दारी उपक्रमाअंतर्गत विविध दाखल्यांचे वाटप

678

शैलेंद्र चौधरी नंदुरबार

धुळे जिह्यातील शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा येथे शासकीय सेवा व योजनांचा महा मेळावा शेवाडे ग्रामपंचायत व सरपंच उपसरपंच व मातोश्री बहुद्देशीय संस्था शेवाडे यांच्या संयुक्त विद्यमानाने या उपक्रमात प्रामुख्याने उत्पन्नाचे दाखले, रहिवासी दाखले,रहिवासी प्रमाणपत्र देण्यात आले असून ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र, नवीन आधार कार्ड,आधार कार्डाची दुरुस्ती,आधार कार्ड मतदान,मतदान नोंदणी करून घेण्यात आली महाविद्यालयीन प्रवेश,शाळाप्रवेश आणि शासकीय योजनांसाठी आवश्यक असणारे विविध दाखले मिळवून देण्यासाठी वरील विभागातर्फे शासन आपल्यादारी उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमाचे उदघाटन गटविकास अधिकारी शिवदे साहेब,शिंदखेडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दुर्गेश तिवारी,विस्तार अधिकारी भिमराव गरुड,तलाठी नारायण मांजलकर,ग्रामसेवक मेघा भामरे,सर्कल धनगर नाना यांच्या हस्ते करण्यात आले महा-ई सेवा केंद्राच्या माध्यमातून हा
उपक्रमाला मोठी मदत मिळाली होती शाळांमधील प्रवेशासाठी तसेच महाविद्यालयीन प्रवेशासाठी सध्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना वेगवेगळ्या दाखल्यांची आवश्यकता भासत आहे त्या बरोबरच विविध शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठीही नागरिकांना अर्जाबरोबर दाखले जोडावे लागतात अनेकदा दाखले मिळवण्यासाठी नागरिकांची धावपळ होत होती नागरिकांची ही गरज लक्षात घेऊन स्थानिक सरपंच बबलू कोळी यांनी शासन आपल्या दारी हा उपक्रम घेण्यात आल्याचे सरपंच यांनी सांगितले या उपक्रमात प्रामुख्याने उत्पन्नाचे दाखले, रहिवासी दाखले,रहिवासी प्रमाणपत्र दिले जाणार असून ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र, नवीन आधार कार्ड,आधार कार्डाची दुरुस्ती,आधार कार्ड मतदान कार्डला जोडणे,श्रावण बाळ योजनेचे ५६ पात्र लाभार्थ्यांचे फॉर्म भरून घेण्यात आले,संजय गांधी योजनेतली ९२ पात्र लाभार्थ्यांचे फॉर्म भरून घेण्यात आले,उज्वला गॅस योजनेतील ३१ पात्र लाभार्थ्यांचे फॉर्म भरून घेण्यात आले यास अनेक काम जागेवरच करून घेण्यात आले यावेळी उपस्थित होते उपजिल्हाप्रमुख व पंचायत समिती सदस्य शानाभाऊ सोनवणे,बेहेडचे सरपंच रावसाहेब पहेलवान,संजय गांधी निराधार योजना समितीत अध्यक्ष डी.एस.सर,शिंदखेडा पंचायत समिती उपसभापती
दरबार आबा,भरत राजपूत सामाजिक कार्यकर्ते चिमठाणे गट व परिसरातील सर्व सरपंच यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.