मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सुट्टीच्या तीन दिवसात नेमकं काय केलं ?

1317

वाई प्रतिनिधी/मुकुंद चौधरी,

मुख्यमंत्री उद्धव जी ठाकरे यांनी तीन दिवस महाबळेश्वर सारख्या निसर्गरम्य स्थळी आपल्या कुटुंबा सह घालवले यावर विरोधकांकडून टीका करण्यात आली होती,परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी या तीन दिवसांच्या सुट्टीत नेमकं केलं तरी काय?असा प्रश्न पडला असेल तर त्याच उत्तर एका कट्टर शिवसैनिकाने दिलं आहे.

वाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीन दिवसांच्या सुट्टीत नेमकं काय केलं.

त्या सुट्टीच्या कालावधी मध्ये शिवसेनेचे तडफदार आमदार तथा कोकणचे नेते भास्कर जाधव यांच्या मुलीचा विवाह होता त्या विवाहाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हजेरी लावली व आशीर्वाद दिले.

महाबळेश्वर येथील पर्यटन विकास बैठकीत महाबळेश्वर येथे स्ट्रॉबेरी संशोधन केंद्र सुरू करून येथे मोठया प्रमाणात ही लागवड करण्याच्या सूचना वजा निर्णय घेतला,सुट्टीच्या कालावधी मध्येही त्यांनी आपला काम करण्याचा सपाटा सुरूच ठेवला.

महाबळेश्वर येथे देशभरातून पर्यटक येत असतात.त्यांच्या सोयी साठी बाहेरच्या परिसरात वाहनतळ उभारून बॅटरी किंवा इलेक्ट्रिक वाहनाचा वापर करता येईल का हे पाहण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संबंधितांना दिल्या.त्याच वेळी त्यांनी कृषी विभागा ला सुद्धा भेट दिली व तेथील पहाणी केली.

अशा रीतीने आपली सुट्टी मुख्यमंत्र्यांनी खूप आनंदात साजरी केली.आपल्या सुट्टीचा उपयोग जनते साठी घालवणारे एकमेव मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभले आहे.तरी सुद्धा विरोधक मुख्यमंत्र्यांना सुट्टी घालवण्याबद्दल राजीनामा द्यायला सांगतात.

 

सौजन्य:- माहिती पीडिया/ बापू शांताराम/ उद्धव ठाकरे सोशल मीडिया