शहीद शिरीषकुमार मंडळातर्फे दंत तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद  

209

शैलेंद्र चौधरी

नंदुरबार येथील शहीद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे गणेशोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या विनामूल्य दंत तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला नगर पालिका संचलित मराठी शाळा क्रमांक आठ मधील शालेय विद्यार्थ्यांसह बालवीर चौक,गवळीवाडा,नवी भोई गल्ली,नवनाथ नगर  भागातील युवकांनी व ज्येष्ठ नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला शंभराहून अधिक रुग्णांची यावेळी दंत तपासणी करण्यात आली आज बुधवार दिनांक 4 सप्टेंबर रोजी बालवीर चौकात गणेशोत्सवानिमित्त विनामूल्य दंत तपासणी शिबिर झाले या शिबिराचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी लायनेस फेमिना क्लबच्या नंदुरबार विभागीय अध्यक्षा डॉ.तेजल चौधरी,रोटरी क्लब अध्यक्ष डॉ.निर्मल गुजराथी,डॉ.विनय कुमार जैन, ज्ञानपीठ प्रतिष्ठानचे चेअरमन योगेश्वर जळगावकर,डॉ.भूषण पालकडे उपस्थित होते. शिबिरात मार्गदर्शन करताना डॉ. तेजल चौधरी यांनी सांगितले की,गणेशोत्सवानिमित्त लोकहिताचे उपक्रम राबविणे गरजेचे आहे गेल्या अनेक वर्षांपासून शहीद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे सामाजिक उपक्रमांची परंपरा सुरू आहे. मानवी जीवनात भौतिक सुखापेक्षा निरामय आरोग्य महत्त्वाचे असून त्यात प्रामुख्याने बालकांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांचे दात सुदृढ राहणे गरजेचे आहे. असेही डॉ.तेजल चौधरी यांनी सांगितले डॉ.निर्मल गुजराती यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना सांगितले की,सातत्याने चॉकलेट व चिंगम सारखे पदार्थ सेवन केल्याने दाताना हानी पोहोचते. याशिवाय तंबाखू सेवनामुळे युवक आणि ज्येष्ठांचे दाढ दुखी वाढते त्यामुळे यावर वेळीच काळजी घेणे आवश्यक असते असे सांगितले कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष महादू हिरणवाळे यांनी केले शहीद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे आयोजित विनामूल्य दंत तपासणी शिबिरास दि नंदुरबार मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नंदुरबार,रोटरी क्लब नंदुरबार,लायनेस फेमिना क्लब नंदुरबार,ज्ञानपीठ प्रतिष्ठान नंदुरबार यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी गोपाळ हिरणवाळे,साहूल कुशवाह, विशाल हिरणवाळे,जितेंद्र जगदाने मुख्यधापक संतोषकुमार सदाराव आदींसह  मंडळाच्या पदाधिकार्‍यांनी परिश्रम घेतले यावेळी मान्यवर उपस्थित होते नंदुरबार येथील शहीद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे गणेशोत्सवानिमित्त आयोजित दंत तपासणी शिबिराचे उद्घाटन डॉ.तेजल चौधरी,डॉ.निर्मल गुजराती डॉ,विनय कुमार जैन,योगेश्वर जळगावकर,महादू हिरणवाळे, डॉ.भूषण पालकडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले रुग्णांची दंत तपासणी डॉ.तेजल चौधरी सोबत डॉ.निर्मल गुजराथी,डॉ.विनय कुमार जैन,महादू हिरणवाळे,योगेश्वर जळगावकर,डॉ.भूषण पालकडे यांनी केली