’ड्राय डे’च्या दिवशी ‘दारु’ पिणे पडले ‘महागात’

882

पुणे प्रतिनिधी,

अयोध्या बाबरी मस्जिद शनिवारी रोजी निकाल दिला जाणार होता. त्यामुळे शासनाने ड्राय डे जाहीर केला होता. व  पुणे परिसरात कडेकोट बंदोबस्त व शनिवारीची सुट्टी अशा वेळी एका तरुणाने घरातच बसून एन्जॉय करायचे ठरविले. त्यासाठी त्याने ऑनलाईनवर वाईन शॉप मधून यांना दारु मागविण्याचे ठरवलं पण दारु पिण्याच्या केवळ शक्यतेचे हा तरुण आपले सर्व शिक्षण विसरुन गेला व समोरच्याला मोबाईल वर आलेला ओ टी पी देऊन बसला. त्याचा त्याला मोठा आर्थिक फटका बसला.याप्रकरणी पियाली दुलाल कर (वय ३२, रा. पेबल्स सोसायटी, बावधन) यांनी हिंजवडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. शनिवारी सायंकाळी त्यांनी ऑनलाईन वाईन व बिअर खरेदी करण्यासाठी ऑनलाईन घुले वाईन शॉप यांचा मोबाईल नंबरवर कॉल केला.तेव्हा फोन घेणाऱ्याने आज ड्राय डे आहे, दुकान बंद आहे, असे सांगून आपण ऑनलाईन खरेदी केली तर मी आपल्या पत्यावर पाठवितो, असे सांगत विश्वास संपादन केला. त्याला पियाली यांनी होकार दिला. त्यानंतर त्यांनी त्यांना हवे असलेल्या बिअर व वाईन यांची ऑर्डर केली. त्यांना एक ओ टी पी आला.हा ओ टी पी कशाचा आहे, याचा विचार न करता त्यांनी तो फोन करणाऱ्याला सांगितला. त्यानंतर ते बिअर व वाईनची वाट पहात बसले. त्याच्या बँक खात्यातून ३१ हजार ७७७ व १९ हजार १ रुपये असा ५० हजार ७७८ रुपये काढून त्यांची फसवणूक केली. हे लक्षात आल्यावर त्यांनी तातडीने हिंजवडी पोलिसांशी संपर्क साधून फिर्याद दिली आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक कुरकुटे पुढील तपास करीत आहे.