मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मागणीला केंद्राचा सकारात्मक विचार;परप्रांतीय मजुरांना मिळणार मोफत प्रवास

544

पुणे प्रतिनिधी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात लॉकडाऊन असल्याने रेल्वे, हवाई, वाहनांनी प्रवासी वाहतूक बंद आहे. त्यामुळे परराज्यातील गोरगरीब मजूर, नागरिक याना आप-आपल्या राज्यातील घरी जायचे त्यामुळे काही मजुरांनी २००० किलोमीटर १५०० किमी, तर काहींनी १२०० किमी चा पायी प्रवास केला आहे. याचाच विचार करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्र्यांच्या व्हिडीओ कॉन्फरन्स मध्ये मजुरांना आपआपल्या राज्यात जाऊ देण्याविषयी मत मांडले होते. त्यांच्या या  मताचा विचार करून केंद्रीय गृहसचिवांनी मजुरांना आप –आपल्या राज्यात जाऊ देण्याची परवानगी दिली.

 मजुरांना आप आपल्या राज्यात जाण्याची परवानगी दिल्यामुळे मजूरांमध्ये आनंदाचे वातारण होते.रेल्वेने  श्रमिक मेल नावाने रेल्वे सुरु केल्या आणि मजूर आपल्या राज्यात पोहचू लागले. पण लॉक डाऊन होऊन जवळपास दोन महिने झाले असून , मजुरांना देखील काही काम नसल्याने त्यांच्याकडे जाण्यासाठी पैसे नव्हते तर काहींनी आपल्याकडे काही होते नव्हते तेवढे पैसे खर्च करून तिकीट घेतले, त्यामुळे प्रवासामध्ये काही लोकांकडे पैसे नव्हते. हि गोष्ट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कानावर पडताच त्यांनी सकाळीच रेल्वे मंत्री तसेच केंद्राकडे गोरगरीब मजुरांना मोफत प्रवास देण्याची मागणी केली होती. या मागणीचा केंद्राने त्वरित विचार करून गावाकडे जाणऱ्या मजुरांचा प्रवास मोफत होणार असल्याचे कळविले. यामध्ये केंद्र सराकर ८५% तर राज्य सरकारे १५% खर्च उचलणार असल्याचे ट्वीट सुब्रमण्यम स्वामी यांनी केले आहे.