पुरंदर मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन सज्ज : तहसीलदार रुपाली सरनोबत

480

 चंद्रकांत चौंडकर, पुरंदर

पुरंदर तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन दिवसरात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे.परंतु नागरिक नियमांचे काटेकोरपणे पालन करताना दिसत नाहीत.पुरंदर तालुका कोरोनामुक्त करण्यासाठी प्रत्येकाने घरातच थांबून सहकार्य करावे,असे आवाहन पुरंदरच्या तहसीलदार रुपाली सरनोबत यांनी केले आहे.पुरंदर तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पुरंदरच्या तहसीलदार रुपाली सरनोबत जीवाची पर्वा न करता काम करताना दिसत आहेत.कोरोनाच्या या संकटात त्या आपल्या कर्तव्यापासून तीळमात्रही विचलित होताना दिसत नाहीत.कोरोनाच्या या संकटामुळे सर्व समाजजीवन ढवळून निघत आहे.याचा परिणाम केवळ आरोग्यावर होत नसून दैनंदिन जागण्यावरही होत आहे.तहसीलदार रुपाली सरनोबत यांच्या नियंत्रणाखाली पुरंदर प्रशासन चांगले काम करत आहे.गावागावांत तहसीलदार रुपाली सरनोबत स्वतः फिरत असून कोरोनाच्या लढाईत जे जे लोक कार्यरत आहेत त्यांना भेटून त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी करत आहेत व त्यांना कसल्या अडचणी आहेत का ? याची विचारपूस करत आहेत. जिल्हाधिकारी अथवा विभागीय आयुक्त यांचे आदेश व सूचना यांचे पालन करून त्या काम करताना दिसत आहेत.कोरोनावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी त्या आपले कर्तव्य करत असून, कोरोना व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी ग्रामीण भागातही खबरदारीच्या उपाययोजना त्यांनी हाती घेतल्या आहेत. नियमांचे पालन न केल्यास दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.तहसीलदार रुपाली सरनोबत यांनी नुकतीच पुरंदर तालुक्यातील नायगाव येथे भेट दिली. नायगाव येथे एक कोरोनाबधित रुग्ण आढळून आला होता.त्या रुग्णाच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींच्या बाबतीत ग्रामपंचायत आणि आरोग्य विभागाने काय उपाययोजना केल्या याबाबत तहसीलदार रुपाली सरनोबत यांनी नायगाव येथे तातडीने भेट देत परिस्थितीचा आढावा घेत योग्य त्या सूचना केल्या.अत्यावश्यक सेवा करीत गावा बाहेर जाणाऱ्या व्यक्तींनी इतरांच्या संपर्कात येऊ नये.आरोग्य विभागाने ग्रामपंचायतीच्या मदतीने लवकर सर्वे पूर्ण करावा.नोकरी निमित्त बाहेर जाणाऱ्या व्यक्तींनी नोटिसा देण्यात यावी अशा सूचना तहसीलदारांनी केल्या.हायरिस्क कॉन्टॅक्ट मधील व्यक्तींचे स्वाब तपासनीस पाठवण्यात आले आहेत.आरोग्य विभागाच्या वतीने घरोघरी जाऊन सर्वे केला जात आहे.काही दिवस गावातील जीवनावश्यक व्यवहार वगळता इतर सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत.सर्वे करण्यासाठी कर्मचाऱ्यांची कमतरता भासत असल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले.लवकरच शिक्षकांना सुध्दा सर्वे करण्यासाठी मदतीसाठी घेण्यात येणार असल्याचेही तहसीलदारांनी सांगितले. यावेळी त्या म्हणाल्या तालुक्यात कोरोना कोविड सेंटर आहे,संशयीतांच्या स्वॉबची एंन्टिजन किट तपासणी सुरु करण्यात आली आहे,बाहेर फिरताना मास्क वापर करणे, वारंवार हात धुणे,शिंकताना व खोकताना तोंडाला रुमाल,व मास्क बांधणे,बाहेरून आल्यानंतर घरात जाण्यापूर्वी हात,पाय,तोंड साबणाने स्वच्छ धुणे,बाहेर अनावश्यक फिरू नये,गावात घोळका करून बसू नये,आपापल्या घरात थांबावे, घराची व परिसराची स्वच्छता ठेवावी,सर्दी-खोकला-ताप आल्यास तत्काळ डॉक्टरांना भेटावे,गावात बाहेरून आलेल्या नागरिकांनी घरात थांबावे व कुटुंबातील व्यक्तीपासून दूर राहावे,भाजीपाला,किराणा, औषधे यांची योग्य दराने विक्री करावी असेही त्यांनी सांगितले.नायगाव येथे त्यांच्या बरोबर मंडलाधिकारी भारत भिसे,तलाठी सुनिता वणवे,आरोग्यसेवक जे डी गायकवाड,ग्रामसेवक विठ्ठल धायगुडे,कोतवाल संतोष जाधव,कर्मचारी आदिनाथ भागवत,बारीकराव कड आदी उपस्थित होते.पुरंदर मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्यांना आमदार संजय जगताप,प्रांत अधिकारी प्रमोद गायकवाड,डी वाय एस पी आण्णासाहेब जाधव,गटविकास अधिकारी मिलिंद टोणपे,वैद्यकीय अधीक्षक डॉ उत्तम तपासे,वैद्यकीय अधिकारी डॉ किरण राऊत,डॉ विवेक आबनावे,मुख्यकार्यकारी अधिकारी विनोद जळक,पूनम शिंदे,पोलीस निरीक्षक डी एस हाके,सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने,राहुल घुगे,राजेश माने,पोलीस उपनिरीक्षक श्यामराव मदने,नंदकुमार सोनवलकर,विजय वाघमारे,तसेच पोलीस विभाग,महसूल विभाग,आरोग्य विभाग,पंचायत विभाग,नगर पालिका विभाग आदींचे सहकार्य मिळत आहे.