दिव्यांग मतदारांना मतदानासाठी प्रशासनातर्फे सर्व मदत बालाजी मंजुळे

800

शैलेंद्रचौधरी, नंदुरबार

दिव्यांग मतदारांनी शंभर टक्के मतदान प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी प्रत्येक पोलींग स्टेशनवर रॅम्प,व्हिलचेअर व वाहन व्यवस्था उपलब्ध करुन दिली जाणार असल्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी मंजुळे यांनी सांगितले.
दिव्यांग मतदारांना मतदानासाठी पुरविण्यात येणाऱ्या सुविधांबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते.बैठकीस अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुधीर खांदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल पवार, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त राकेश महाजन, एनएमएसचे प्रा.डॉ. माधव कदम व सर्व नगरपालिकेचे मुख्य अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी मंजुळे यांनी व्हीलचेअर उपलब्धतेबाबत नगरपालिका क्षेत्रातील माहिती नंदुरबार 25, शहादा 20,नवापूर 12 तळोदा येथे 8 आणि धडगांव येथे 5 व्हीलचेअर उपलब्ध केल्या आहेत. असून जिल्ह्यात 595 ग्रामपंचायती असून आतापर्यंत 127 ग्रामपंचायतींनी व्हीलचेअर खरेदी केल्या आहेत.उर्वरित ग्रामपंचायतीनी त्वरित व्हीलचेअरची व्यवस्था करून त्या दिव्यांग मतदारांना वेळेत उपलब्ध करुन द्याव्यात,असे निर्देश त्यांनी दिले.
जिल्हाधिकारी म्हणाले , मतदारांना नगरपालिका क्षेत्रात नगरपालिकेचे वार्ड अधिकारी तर ग्रामीण भागात तलाठी, ग्रामसेवक हे दिव्यांग मतदारांना मतदानासाठी मदत करतील.यासाठी जिल्हा प्रशासन व नगरपालिका दिव्यांग मतदारांना मतदानाला जाण्यासाठी वाहन व्यवस्था उपलब्ध करुन देतील
दिव्यांग मतदारांना मतदानाच्या ठिकाणी आवश्यक सुविधा उपलब्ध करून घ्याव्यात. त्यांना मतदान करणे सुलभ होईल याकडे लक्ष द्यावे.दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या शासकीय आणि अशासकीय संस्थांच्या माध्यमातून मतदारांमध्ये जनजागृती करण्यात यावी.दिव्यांग मतदारांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी समजावून घेत आवश्यक व्यवस्था करावी,असेही त्यांनी यावेळी सांगितले.