कोंढवा ब्रुद्रुक ग्रामस्थ आणि भारती हास्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर संपन्न

937

कोंढवा प्रतिनिधी :-

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अलीकडेच रक्त पुरवठा कमी होत असल्याची शंका व्यक्त केली होती. तसेच रक्तदान शिबीरांची आवश्यकता बोलून दाखविली होती. राज्यात रक्ताचा तुटवडा होण्याची शक्यता असल्याने रक्तदानाचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले होते. त्याला प्रतिसाद देत कोंढवा ब्रुद्रुक ग्रामस्थ आणि भारती हास्पिटल यांच्या संयुक्त विदयमानाने रक्तदान शिबीर आयोजित केले होते. या शिबिरात  ८७ रक्तदात्यांनी रक्तदानाचे पवित्र  काम केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छ वातावरणात, गर्दी टाळत सोशल – फिजिकल डीस्टस्नचे सर्व नियम पाळत आज कोंढवा ब्रुद्रुक गावात रक्तदान शिबिर पार पडले.

 हे शिबीर यशस्वी होण्यासाठी सुखदेव कामठे, धनंजय गायकवाड, चंदन कामठे, शुभम कामठे, केतन कामठे, रणजित आतकिरे, आनंद कामठे, ओंकार कामठे, सुदश॔न मरळ, अक्षय अनंता लोणकर, अभिषेक लोणकर यांनी विशेष प्रयत्न केले.  भारती हास्पिटलचे डॉक्टर मलिका अगरवाल व दिनेश जांगडे  व त्यांची टीम यांच्या मार्गदर्शनाखाली  यशस्वीरित्या रक्तदान पार पाडले. या शिबिरास नागरीकांचा उस्फुर्त सहभाग लाभला असून परिसरात गावाची चर्चा मोठ्या प्रमाणावर पहावयास मिळत आहे.