विविध मागण्यांसाठी लोक संघर्ष मोर्चाचे मुख्यमंत्रयांना निवेदन

693

शैलेंद्र चौधरी नंदुरबार

दिनांक २४ऑगस्ट रोजी भुसावळ येथे आलेल्या महाजनादेश यात्रेच्या वेळी लोक संघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची भेट घेतली यावेळी1)महाराष्ट्रात 1 लाखा पेक्षा जास्त वन जमीन धारक आहेत ज्यांचे दावे मंजूर करत त्यांना वनपट्टे मंजूर झाले आहेत त्यांच्या वर अद्यापही वन विभागाच्या केसेस सुरूच आहेत अश्या सर्व केसेस तात्काळ काढून टाकण्याची मागणी लोक संघर्ष मोर्चाने केली असून मुख्यमंत्री मोहद्यानी त्याला तात्काळ सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरच ह्या केसेस मागे घेण्याचे आश्वासन दिले आहे ह्या केसेस मागे घेतल्यास महाराष्ट्रातील 1 लाख कुटुंबांना त्याचा फायदा होईल
2)मागील वर्षी च्या दुष्काळाचा निधी अद्याप चोपडा,यावलमुक्ताईनगर व जामनेर तालुक्यातील वन जमीन धारकांना मिळालेला नाही तसेच नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील वन जमीन धारकांना ही अद्याप 80 कोटी इतकी नुकसान भरपाई मिळालेली नाही राज्य सरकार तो निधी तात्काळ देईल व लगेच जिल्ह्यात तो निधी वंनजमिन धारकांना देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले भुसावळ येथील दीनदयाळ नगरचे पुनर्वसन,दिपनगर औष्णिक ऊर्जा प्रकल्पा मुळे बाधित होणाऱ्या गावांना शेती सुधार योजना व वन कायद्याची अमलबजावणी तसेच तापी नदीतील 5 टीएमसी पाणी उचलण्या बाबत पालकमंत्री तथा राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन हे लक्ष घालतील व त्या संबंधी ते लवकरच प्रशासन व संघटनेची बैठक बोलवतील असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले महाराष्ट्रातील आदिवासींचे खावटी कर्ज जवळ जवळ 480 कोटी रुपये शासनाने संघटनेच्या उलगुलान मोर्चाच्या वेळी मागणी केल्या प्रमाणे रद्द केले असून नवीन खावटी कर्ज योजने ऐवजी प्रत्येक आदिवासी कुटुंबाला प्रति माणसी पाच किलो धान्य प्राधान्य क्रमाच्या नुसार दिले जाण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
वन कायद्या बद्दल मुख्य साचिवां सोबत लवकरच बैठक बोलावून जनसंघटनाचे मत जाणून घेतील हेही मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी सांगितले यावेळी पालकमंत्री गिरीश भाऊ महाजन व जिल्हा पोलिस अधीक्षक उगले उपस्थित होते लोक संघर्ष मोर्चाच्या वतीने प्रतिभा शिंदे,सचिन धांडे, चंद्रकांत चौधरी,केशव वाघ,इरफान तडवी,रमेश बारेला, रैना बारेला,वैशाली सोनार सीमा चौधरी हे उपस्थित होते