रामचंद्र म्हात्रे विद्यालयातील विद्यार्थ्यांचे उज्जवल यश संपादन

811

रायगड ,गिरीश भोपी( JNPT )

जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर उत्तम बुद्धी सोबत आपले आरोग्य चांगले हवे आणि खेळ हे ह्याचे उत्तम माध्यम आहे. खेळ हे माणसाला प्रत्यक्ष कसरती कडे वळवितात खरच आणि या खेळाच्या माध्यमातून आपला व्यायाम होत असतो . I E S जवाहरलाल नेहरु विद्यालयातील भरविलेलया तालुकास्तरावर अथेलेटीच्स च्या स्पर्धा आणि या तालुका स्तरीय या विविध स्पर्धेत रामचंद्र म्हात्रे विद्यालय आवरे,विद्यालायातील विध्यार्थीनी म्हणजे थाली फ़ेक ,गोळा फ़ेक,लांब उडी उंच उडी आणी धावणे स्पर्धेत उज्ज्वल सुयश मिळलविले आहे सदर विद्यार्थींनी समीक्षा गावंड हिने थाली फ़ेक प्रथम,गोळा फ़ेक द्वितीय ,19 वर्षाखाली मुलांच्या गटात मन म्हात्रे याने थाली फ़ेक प्रथम, तसेच ॠतिक पटिल उंच उडी प्रथम वि नंती चव्हाण हिने उंच उडी प्रथम,व लांब उडी,आणी धावणे या क्रिडा प्रकारात यशाची मला अपल्या गळ्यात रोवली व विद्यालयाच्या नाव लौकिकला साजेशि कामगिरी करत विद्यालयाच्या शिरपेच्यात मानाचा तुरा रोवला यशाची माळ आपल्या गळ्यात घातली आहे गत वर्षी सुद्धा17 वयोगटातील 59 किलो या वजनी गटात हे घवघवीत यश मिळविले होते म्हणजे अथेलेटिक स्पर्धा आणि रामचंद्र म्हात्रे विद्यालय आवरे चे यश हे जणू काही समीकरण झाले आहे विद्यार्थ्यांनी या मिळविलेल्या यशाचे कौतुक करताना विद्यालयाचे प्राचार्य श्री गायकवाड सर ,शिक्षक वृंद आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी खेळात समाविष्ट विध्यार्थी समीक्षा गावंड,विनंती चव्हाण ,व मन म्हात्रे हे सर्व विद्यार्थी व विध्यार्थींचे मार्गदर्शक शिक्षक श्री बी .एस. जाधव सर, तसेच कल्पना म्हात्रे यांचे विशेष कौतूक करण्यात येत आहे.अश्या प्रकारे मैदानी खेळा त रामचंद्र म्हात्रे विद्या लय आवरे ची विजयी पताका.सदर विध्यर्थी ची निवड ही जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेसाठि करण्यात अली आहे