आचारसंहिता भंगाबाबत तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक

832

शैलेंद्र चौधरी, नंदुरबार

आचारसंहिता भंगाबाबत तक्रारीसाठी 210777
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया सुरु झाली असून आदर्श आचारसंहितेचे पालन व्हावे यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आचारसंहिता कक्ष निर्माण करण्यात आला असून दूरध्वनी क्रमांक 02564-210777 सुरु करण्यात आला आहे.
जनतेने आचारसंहिता भंगाबाबत तक्रार 02564-210777 या क्रमांकावर करावी असे आवाहन जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांनी के ले आहे.जिल्हाधिकारी कार्यालायात स्थापन करण्यात आलेल्या आचारसंहिता कक्षातच, कायदा व सुव्यवस्था कक्ष सुरु करण्यात आला आहे. हा कक्ष 24 तास सुरु राहणार असून निवडणूकीत होणाऱ्या गैरप्रकाराला प्रतिबंध करण्यासाठी कार्यरत राहणार आहे. मतदान पारदर्शक पद्धतीने आणी शांततेच्या वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. निवडणूकीत नागिरकांचा सहभाग महत्वाचा असून नागिरकांनी जिल्ह्यात आचारसंहिता भंग होत असल्यास त्याची माहिती 02564-210777 या क्रमांकावर करावी  असे प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.