जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धेत निवासी मुकबधीर शाळा अनसिंग प्रथम प्राविण्य प्राप्त ,

697

“तिन वर्ष परंपरा कायम ठेवल्याने विद्यार्थ्यांसह शिक्षकाचा केला गुणगौरव”

वाशिम / अनसिंग (प्रतिनिधी ) :-

वाशिम येथील स्वागत लॉन येथे घेण्यात आलेल्या लॉयन्स क्लब ऑफ वाशिम व्दारा आयोजित’ उत्सव आझादी का “2019” च्या नृत्य स्पर्धेत निवासी मुकबधीर विद्यालय अनसिंगला प्रथम पारितोषिक मिळाले असून विजयाची सलग तीन वर्षे परंपरा कायम ठेवल्यामुळे विद्यार्थांसह शिक्षकवृदांचा विशेष गुणगौरव करण्यात आला. हया स्पर्धेत जिल्हाभरातील विविध शाळेने सहभाग नोंदविला होता.
वाशिम येथील लायन्स क्लब व्दारा आयोजित दरवर्षी प्रमाणे दि. 15 आगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधुन स्वागत लॉन येथे “उत्सव आझादी का” कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हया नृत्य स्पर्धेत जिल्हाभरातील नाना, विविध शाळेने सहभाग नोंदविला. हयात प्रेक्षकांची प्रचंड प्रमाणात उपस्थिती लाभली. दिव्यांग ग्रुप मधुन अनसिंग येथील निवासी मुकबधीर विद्यालय हया शाळेने आदिवासी नृत्य सादर करून उपस्थितांचे मने जिंकली आणि जिल्हातून प्रथम पारितोषिकांची मानकरी ठरली. विशेष म्हणजे सलग तीन वर्षे प्रथम प्राविण्य प्राप्त मिळविणाऱ्या शाळेच्या वतीने शिक्षक कर्मचाऱ्यांचे विशेष गुणगौरव करण्यात आले. हयात नृत्य दिग्दर्शक (बेस्ट कोरिओग्राफर ) म्हणून कु.एस. डी. चांदेकर मानकरी ठरल्या व त्यांना पारितोषिक देण्यात आले.
निवासी मुकबधीर विद्यालयाचे संस्था अध्यक्ष चंद्रकांतदादा देवळे ह्यांचे आदेशावरून तथा मुख्याध्यापक नितीन कोल्हे ह्यांचे मार्गदर्शनाखाली आर. आर.खवले, जि. आर.काळबांडे, पि. व्ही. देशमुख, कु.एस. डी. चांदेकर ह्यांनी यशस्वीकरिता अथक परिश्रम घेतले.